वॉटसनला साडेनऊ, नेगीला साडेआठ कोटी!
By admin | Published: February 7, 2016 03:28 AM2016-02-07T03:28:16+5:302016-02-07T03:28:16+5:30
आॅस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने तब्बल साडेनऊ कोटीत तर पवन नेगी या नवख्या खेळाडूला तब्बल साडेआठ
बेंगळुरू : आॅस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन सर्वांत महागडा खेळाडू ठरला. त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने तब्बल साडेनऊ कोटीत तर पवन नेगी या नवख्या खेळाडूला तब्बल साडेआठ कोटी रुपये खचूर्न दिल्ली डेअरडेव्हिल्सने खरेदी केले. युवराजसिंगला सनराइजर्स हैदराबादने सात कोटी देऊन विकत घेतले. आयपीएलच्या नवव्या सत्राचा लिलाव शनिवारी पार पडला.
मागच्यावर्षी १६ कोटी रुपये मिळविणाऱ्या युवीची बेस प्राईज दोन कोटी होती. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात युवीला आपल्याकडे खेचण्यासाठी स्पर्धा लागली पण सनराइजर्सने त्याला बोली लावून खरेदी केले. अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा याला साडेपाच कोटीत सनराइजर्सने आणि ईशांत शर्मा याला पुणे जायन्टस्ने ३.८ कोटीत खरेदी केले. केव्हिन पीटरसन याला देखील पुणे संघाने साडेतीन कोटी व गुजरात लॉयन्सने ड्वेन स्मिथला २.३ कोटीत खरेदी केले. वेस्ट इंडिजचा फलंदाज कार्लोस ब्रेथवेट याला दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४.२ कोटीत स्वत:कडे घेतले. त्याची बेस प्राईज फक्त ३० लाख होती. भारताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याला किंग्स इलेव्हन पंजाबने साडेसहा कोटीची बोली लावून खरेदी केले.
युवा यष्टिरक्षक- फलंदाज संजू सॅमसन हा ४.२ कोटीत दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या तंबूत गेला. मिशेल मार्श याला पुणे संघाने ४.८ कोटीत, मागच्या वर्षी दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून १२ कोटी घेणाऱ्या दिनेश कार्तिकला गुजरात लॉयन्सने २.३ कोटीत, डेल स्टेन आणि ड्वेन स्मिथ यांना देखील याच किमतीत खरेदी केले. मुंबई इंडियन्सने जोस बटलर याला ३.८ कोटीत आणि टिम साऊदीला २.५ कोटीत खरेदी केले. प्रवीण कुमारला गुजरातने ३.५ कोटी, धवल कुलकर्णी याला दोन कोटी आणि इरफान पठाणला एक कोटीत खरेदी केले. द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज काइल एबोट याला किंग्ज पंजाबने २़.१० कोटीत, अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने दोन कोटीत तर बरिंदर सरन याला सनराइजर्सने १.२ कोटीत खरेदी केले.
लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सची मालकिण नीता अंबानी, किंग्स इलेव्हन पंजाबची मालकिण प्रिती झिंटा, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मालक विजय माल्या, माजी खेळाडू रिकी पाँटिंग, स्टीफन फ्लेमिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, टॉम मूडी, ब्रॅड हॉग, आणि डॅनियल व्हेट्टोरी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात मार्की खेळाडू विकले गेल्यानंतर लिलाव थंड वाटला. अनेक खेळाडूंवर बोली लागलीच नाही.
आॅस्ट्रेलिया टी-२० संघाचा कर्णधार अॅरोन फिंच, न्यूझीलंडचा आक्रमक फलंदाज मार्टिन गुप्तिल,आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली, द. आफ्रिकेचा हाशिम अमला, निवृत्त झालेला माहेला जयवर्धने, मायकेल हसी आणि ब्रॅड हॅडिन यांच्याकडे फ्रॅन्चायसींनी दुर्लक्ष केले.
विंडीजचा डेरेन सॅमी, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान, आॅस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा, डेव्हिड हसी, अॅडम व्होजेस, भारताचा मुनाफ पटेल, यांच्यावरही बोली लागली नाही. लिलाव पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंना पुन्हा एक संधी मिळणार आहे.(वृत्तसंस्था)
भाव न मिळालेले खेळाडू
अॅरोच फिंच, मार्टिन गुप्तिल, जॉर्ज बेली,हाशिम अमला, माहेला जयवर्धने, मायकेल हसी,
अक्षय व जितेशला संधी
विदर्भ रणजी संघाचे दोन खेळाडू अक्षय कर्णेवार आणि जितेश शर्मा यांना आयपीएलमध्ये संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अक्षय कर्णेवाराला तर मुंबई इंडियन्सने जितेश शर्माला प्रत्येकी १० लाख रुपयांना करारबद्ध केले.
वॉटसन रॉयल चॅलेंजर्स ९.५ कोटी
नेगी दिल्ली डेअरडेव्हिल्स ८.५ कोटी
युवराज हैदराबाद ७ कोटी
मॉरिस दिल्ली डेअरडेव्हिल्स ७ कोटी
मोहित शर्मा पंजाब ६.५ कोटी
नेहरा हैदराबाद ५.५० कोटी
मार्श पुणे सुपर जायन्टस् ४.८ कोटी
सॅमसन डेअरडेव्हिल्स ४.२ कोटी
करुण नायर डेअरडेव्हिल्स ४ कोटी
बटलर मुंबई इंडियन्स ३.८ कोटी
ईशांत पुणे जायन्टस् ३.५कोटी
पीटरसन पुणे जायन्टस् ३.५ कोटी
प्रवीण कुमार गुजरात ३.५ कोटी
साऊदी मुंबई इंडियन्स २.५ कोटी
ड्वेन स्मिथ हैदराबाद २.३ कोटी
डेल स्टेन हैदराबाद २.३ कोटी
दिनेश कार्तिक गुजरात २.३ कोटी
धवल कुलकर्णी गुजरात २ कोटी
स्टुअर्ट बिन्नी रॉयल चॅलेंजर्स २ कोटी
हेस्टिंग्ज नाईट रायडर्स १.३ कोटी
इरफान पठाण पुणे जायन्टस् १ कोटी
कॉलिन मुन्रो नाईट रायडर्स ३० लाख
महागडे खेळाडू
शेन वॉटसनआरसीबी९.५
पवन नेगी डीडी८.५
युवराजसिंग एसआरएच ७.००
ख्रिस्टोफर मॉरिस डीडी ७.००
मोहित शर्मा किंग्स पंजाब ६.५
आशिष नेहरा ६.५ एसआरएच
मिशेल मार्श ४.८ आरपीएस
मुरगन अश्विन ४.५ आरपीएस