आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्हीच दोषी : सलमान
By admin | Published: April 24, 2016 03:52 AM2016-04-24T03:52:56+5:302016-04-24T03:54:01+5:30
भारतात आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्ही स्वत: दोषी आहोत. भारतीय लोक क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळांना पसंत करीत नाहीत. पाठिंबा देण्यात कमी पडत असल्याने आॅलिम्पिक
नवी दिल्ली : भारतात आॅलिम्पिक खेळ लोकप्रिय न होण्यामागे आम्ही स्वत: दोषी आहोत. भारतीय लोक क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळांना पसंत करीत नाहीत. पाठिंबा देण्यात कमी पडत असल्याने आॅलिम्पिक खेळ देशात मागे राहिल्याचे रोखठोक प्रतिपादन बॉलिवूड स्टार सलमान खान याने केले
आहे. सलमानला रियो
आॅलिम्पिकसाठी भारतीय ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर बनविण्यात आले आहे.
सलमान म्हणाला,‘‘अन्य खेळ लोकप्रियतेत माघारण्यामागे क्रिकेटला दोष दिला जातो. पण, माझ्या मते लोक अन्य खेळ पाहू इच्छित नाहीत. जितके प्रेक्षक आॅलिम्पिक खेळांना मिळायला हवे तितके भारतात मिळत नाहीत. क्रिकेट पसंत करणारे लोक गल्लीबोळात आहेत. अन्य खेळांच्या तुलनेत क्रिकेटला अधिक महत्त्व दिले जात असल्याने आम्ही स्वत: दोषी आहोत.’’ जगातील लोक आॅलिम्पिकसाठी एकत्र येतात. लोकांना आपल्या हिरोंना पाहण्याची संधी मिळते. पण, यापुढे मी आॅलिम्पिक खेळांना लोकप्रिय करण्यासाठी मेहनत घेणार आहे. भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्यााठी रियोला जाण्याची योजना आखत असल्याचे सलमानने सांगितले.(वृत्तसंस्था)