आम्ही खराब क्रिकेट खेळलो नाही : राहुल द्रविड

By admin | Published: May 15, 2015 01:05 AM2015-05-15T01:05:11+5:302015-05-15T01:05:11+5:30

राजस्थान रॉयल्सचे मेंटर राहुल द्रविडने आज त्यांच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या विद्यमान पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना वगळता

We did not play bad cricket: Rahul Dravid | आम्ही खराब क्रिकेट खेळलो नाही : राहुल द्रविड

आम्ही खराब क्रिकेट खेळलो नाही : राहुल द्रविड

Next

मुंबई : राजस्थान रॉयल्सचे मेंटर राहुल द्रविडने आज त्यांच्या संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या विद्यमान पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना वगळता खराब क्रिकेट खेळलो नसल्याचे म्हटले आहे.
द्रविड म्हणाला, ‘‘आम्ही सलग पाच सामने जिंकून शानदार सुरुवात केली. आमचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले. त्यानंतर पुन्हा दोन सामने गमावले. आम्ही आरसीबीविरुद्धचा एक सामना सोडता खराब क्रिकेट खेळलो नाही. त्या सामन्यात आम्ही १३0 धावांतच सर्व बाद झालो होतो. दुसरा सामना कमी अंतराने गमावला.’’ रॉयल्स सध्या आयपीएल गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. त्यांना १६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळायचे आहे आणि हा सामना त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे.
द्रविडने आरसीबीचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सची स्तुती केली. त्याने मुंबईविरुद्ध ५९ चेंडूंतच नाबाद १३३ धावा ठोकल्या होत्या. तो म्हणाला, ‘‘सर्वोत्तम फॉर्ममध्ये असतानाही मी त्याच्याप्रमाणे खेळण्याचा विचार करू शकत नाही. आक्रमक कसे खेळायचे हे प्रथम विव्ह रिचडर््सने शिकवले आणि सनथ जयसूर्या व रमेश कालुवितरणा यांनी पहिल्या १५ षटकांत फलंदाजी करणे शिकवले.’’
बॅट आणि चेंडूंत अधिक समतोल असण्याची मागणी करताना द्रविडने टी-२0 सामन्यातदेखील प्रतिषटक दोन उसळते चेंडू टाकण्याची परवानगी देण्यात येण्याच्या प्रस्तावाची पाठराखण केली. तो म्हणाला, ‘‘सध्या जर गोलंदाजाने त्याच्या कोणा एका षटकात पहिलाच चेंडू उसळता टाकल्यास फलंदाज त्याच्यावर दबाव आणू शकतो. कारण फलंदाजास त्या षटकात गोलंदाज आणखी एक बाऊन्सर टाकू शकणार नाही हे माहीत असते. त्याचप्रमाणे सीमारेषेचे अंतरही मोठे असायला हवे.’’
वीरेंद्र सेहवागचे उदाहरण देताना द्रविडने सर्वच स्वरूपांत सेहवागने एकसारखीच फलंदाजी केल्याचे म्हटले. तो म्हणाला, ‘‘वीरू सर्वच स्वरूपात एकसारखाच खेळतो.’’ (वृत्तसंस्था)
 

Web Title: We did not play bad cricket: Rahul Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.