आम्ही संघात जास्त बदल करीत नाही : ब्राव्हो

By admin | Published: May 13, 2015 11:20 PM2015-05-13T23:20:19+5:302015-05-13T23:20:19+5:30

चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये आपले सातत्याने वर्चस्व राखले आहे आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनुसार त्यांच्या यशाचे गुपित

We do not make much changes in the team: Bravo | आम्ही संघात जास्त बदल करीत नाही : ब्राव्हो

आम्ही संघात जास्त बदल करीत नाही : ब्राव्हो

Next

नवी दिल्ली : चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये आपले सातत्याने वर्चस्व राखले आहे आणि संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होनुसार त्यांच्या यशाचे गुपित हे ते त्यांच्या मुख्य खेळाडूंना संघात कायम ठेवतात आणि संघात जास्त बदल करीत नाही.
गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागणाऱ्या चेन्नई संघाचे आयपीएल गुणतालिकेत आता १३ सामन्यात ८ विजय असून ते अव्वल स्थानावर आहेत. ब्राव्होने त्यांचा संघ आव्हान पत्करण्यास नेहमी सज्ज असतो, असेही सांगितले.
ब्राव्हो म्हणाला, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही संघात काटछाट आणि बदल करीत नाहीत. खेळाडूंचा लिलाव असो अथवा अंतिम संघाची निवड, त्यात व्यवस्थापन चांगले काम करीत आहे. ते मुख्य खेळाडूंसोबत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मैत्री आणि संघात एकजूटता असते व हे खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला संघ चांगला करायचा असेल तर तुम्हाला चॅम्पियन संघ बनावे लागेल. तुम्ही कोणत्याही संघाविरुद्ध खेळले तर त्यांना पराभूत करावे लागेल. निश्चितच आम्ही अव्वल दोन स्थानात राहू इच्छितो.
आयपीएल आठमध्ये १२ डावांत एकूण १९ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्राव्हो अव्वल स्थानी आहे.
अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंच्या कारकीर्दीला वळण देण्याचे श्रेय आयपीएलला देताना ब्राव्होने निश्चितच ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर यशाचा मार्ग असल्याचे ठासून सांगितले.
ब्राव्हो म्हणाला, ‘‘आयपीएल फक्त वेस्ट इंडीजमधीलच नव्हे, तर सर्व खेळाडूंची मदत करीत आहे. भारतीय खेळाडूंनाही फायदा होत आहे. शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांना पाहा. हे सर्वच आयपीएलच्या यशामुळे चमकले आहेत. खेळाडूंना मिशेल जॅन्सन आणि डेल स्टेनसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याची संधी मिळत आहे. हे अशा खेळाडूंसोबत आयपीएलमध्ये जितके जास्त खेळतात तसा त्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आत्मविश्वास उंचावतो आणि ते आणखीन जास्त चांगले खेळाडू बनतात.’’

Web Title: We do not make much changes in the team: Bravo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.