आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो - विराट कोहली

By admin | Published: July 10, 2017 01:15 PM2017-07-10T13:15:31+5:302017-07-10T13:31:52+5:30

पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे.

We were not the victorious champions - Virat Kohli | आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो - विराट कोहली

आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो - विराट कोहली

Next

ऑनलाइन लोकमत
किंग्स्टन, दि. 10 -  एव्हिन लेव्हिसने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने रविवारी खेळल्या गेलेल्या एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव केला. या  पराभवाचे खापर कर्णधार विराट कोहलीने फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर फोडलं आहे. पहिल्या टी 20 सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने विराट म्हणाला, वेस्ट इंडिजने आमच्या पेक्षा सरस खेळाचे पदर्शन केलं. चांगल्या सुरुवातीनंतर आमच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी नांगी टाकली. क्षेत्ररक्षणावेळीही भारतीय खेळाडूंनी झेल सोडल्याचा फटका बसला. वेस्ट इंडिजच्या संघानी आमच्यापेक्षा सरस खेळ केला. कालची भारतीय संघाची कामगिरी पाहता आम्ही विजयाचे दावेदार नव्हतो. 

प्रथम फलंदाजी करताना भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावां केल्या होत्या. पण एव्हिन लेव्हिसने (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर त्यांनी सहज विजय मिळवला. भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या वेळी विकेट गमावल्यामुळे भारत 190 धावां करु शकला. हाणामारीच्या षटकात महत्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे 20-30 धावा कमी निघाल्या. 
पुढे बोलताना कोहली म्हणाला, आलेल्या संधी सोडल्या नंतर तुम्ही विजयाचे दावेदार नाही होऊ शकत. फलंदाजांनी विजयाचा पाया रचायला हवा होता. दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली पण एका फलंदाजांनी 80-90 धावांची खेळी करायला हवी होती. फलंदाजी प्रमाणे आमच्या गोलंदाजांनीही निराशजनक कामगिरी केली. टी 20 च्या बदल्या प्रारुपामध्ये अनेक वाईट दिवसाला सामोरं जावं लागू शकतं. वेस्ट इंडिज टी 20 चा चांगला संघ आहे. सध्या आपला संघ परिवर्तनाच्या दारात उभा आहे. संघात अनेक बदल होतं आहेत. त्यामुळे विजय-पराजयाचा सामना आपल्याला कारावा लागेल. 
आणखी वाचा -
"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा
कोचपदाच्या शर्यतीत शास्त्री आघाडीवर
काल झालेल्या एकमेव टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रीत केलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 190 धावा केल्या होत्या. 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एव्हिन लेव्हिसची (नाबाद १२५ धावा, ६२ चेंडू, ६ चौकार, १२ षटकार) शतकी खेळी व त्याने मार्लोन सॅम्युअल्ससह (नाबाद ३६) दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या ११२ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारताचा ९ गडी व ९ चेंडू राखून पराभव केला

 

Web Title: We were not the victorious champions - Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.