जिथे सांगाल तिथे आम्ही खेळू : युवराज
By admin | Published: April 22, 2016 02:30 AM2016-04-22T02:30:58+5:302016-04-22T02:30:58+5:30
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तीव्र विरोधामुळे आयपीएलसामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याबाबत निर्णय झालेला असताना ‘आमचे काम केवळ खेळणे असून, जेथे सांगाल तिथे आम्ही खेळू,’
मुंबई : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या तीव्र विरोधामुळे आयपीएलसामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याबाबत निर्णय झालेला असताना ‘आमचे काम केवळ खेळणे असून, जेथे सांगाल तिथे आम्ही खेळू,’ असे स्पष्ट मत भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबादचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने व्यक्त केले.
मुंबईतील खार रोड येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात युवराजने आपले मत व्यक्त केले. यावेळी भारताचा स्टार फुटबॉलपटू रॉबिन सिंग देखील उपस्थित होता. यावेळी युवी म्हणाला, ‘आयपीएलमुळे कधीच कोणाचे वाईट होणार नाही. मात्र, मी एक खेळाडू असून, याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही आणि तसा मला अधिकारही नाही. आम्ही क्रिकेट खेळतो आणि तेच आमचे काम आहे. त्यामुळे जेथे सांगाल तेथे आम्ही खेळू.’
टी-२० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर अद्याप क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीच्या पुनरागमनाकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. याविषयी युवीने सांगितले, ‘मी आता दुखापतीतून सावरलो असून, माझ्या पायाचे प्लास्टर काढण्यात आले आहे. आगामी ६ मे ला होणाऱ्या सामन्याद्वारे पुनरागमनाचा माझा निर्धार आहे. शुक्रवारी मी हैदराबादला रवाना होणार असून, संघासह माझा सराव सुरू होईल. त्यामुळे ६ मे च्या सामन्यासाठी मी सज्ज असेल, अशी अपेक्षा करतो आणि विश्वास देतो की मी संघासाठी माझा सर्वोत्तम खेळ करेल.’ ‘शिखर धवन महत्त्वाचा खेळाडू आहे. प्रत्येक खेळाडूच्या फॉर्ममध्ये चढ-उतार होत असतो. (क्रीडा प्रतिनिधी) ते ‘नो बॉल्स’ पडले नसते तर...
टी-२० विश्वचषक उपांत्य सामन्याविषयी युवी म्हणाला, ‘ कधी कधी काही खेळाडूंकडून अपेक्षित कामगिरी होत आहे. माझ्यामते ‘त्या’ दोन नोबॉलमुळे आम्ही विंडीजविरुद्ध अपयशी ठरलो. पण विंडीज संपूर्ण स्पर्धेत चांगले खेळले. त्यांना त्यांच्या विजयाचे श्रेय द्यावे लागेल.’