एक आठवडा आधी हवा लंका दौरा

By admin | Published: July 8, 2015 01:12 AM2015-07-08T01:12:47+5:302015-07-08T01:12:47+5:30

तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल करण्याची ‘बीसीसीआय’ची इच्छा आहे.

A week before the air lanka tour | एक आठवडा आधी हवा लंका दौरा

एक आठवडा आधी हवा लंका दौरा

Next

मुंबई : तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल करण्याची ‘बीसीसीआय’ची इच्छा आहे. हा दौरा निर्धारित वेळेपेक्षा एक आठवडा आधी सुरू व्हावा, असे बोर्डाला वाटते.
झिम्बाब्वेत तीन वनडे आणि दोन टी-२० सामने खेळण्यासाठी मंगळवारी पहाटे रवाना झालेला भारतीय संघ १९ जुलै रोजी भारतात परत येईल. यामुळे खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळू शकणार नाही. लंकेविरुद्धची मालिका पुढील महिन्यात निर्धारित असली तरी वेळापत्रक निश्चित झालेले नाही. बीसीसीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-लंका दरम्यानच्या मालिकेसाठी आवश्यक असलेले सर्व सोपस्कर लवकरच पूर्ण केले जातील. या दौऱ्याचे वेळापत्रक पुढील तीन दिवसांत जाहीर केले जाईल.
भारतीय संघ २ सप्टेंबरपर्यंत लंकेहून परत आल्यास आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी खेळाडूंना एक महिन्याची विश्रांती मिळू शकते.
भारताचा संघ पाच वर्षांच्या दीर्घ काळानंतर लंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. २०१० साली तेथे खेळविण्यात आलेली मालिका
१-१ ने बरोबरीत सुटली होती. लंका दौरा ११ आॅगस्टपासून सुरू होण्याची शक्यता असून, बीसीसीआयला तो एक आठवडा आधी सुरू व्हावा असे वाटते. या दौऱ्यात कसोटीशिवाय वन डे आणि टी-२० सामन्यांचे आयोजन होईल.(वृत्तसंस्था)

कसोटी कार्यक्रम
१२ ते १६ आॅगस्ट - गाले
२० ते २४ आॅगस्ट - कोलंबो
२८ आॅगस्ट ते १ सप्टेंबर - पाल्लेकल

Web Title: A week before the air lanka tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.