वेस्ट इंडिज बोर्डाकडून डॅरन सॅमीची कानउघडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2016 04:37 PM2016-04-04T16:37:54+5:302016-04-04T16:37:54+5:30
वर्ल्डकप विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंच्या जल्लोषाबरोबर बोर्ड आणि विडींज संघातील वादही समोर आले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ४ - वर्ल्डकप विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंच्या जल्लोषाबरोबर बोर्ड आणि विडींज संघातील वादही समोर आले आहेत. विजयानंतर डॅरन सॅमीने बोर्डावर केलेल्या टीकेबद्दल वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने सॅमीची कानउघडणी केली आहे तसेच सॅमीने विजयाच्याक्षणी जे अयोग्य मतप्रदर्शन केले त्याबद्दल विडिंज क्रिकेट मंडळाने कॅरेबियन चाहत्यांची माफी मागितली आहे.
इंग्लंडला नमवून विश्वविजेतेपद जिंकल्यानंतर सॅमीने खेळाडू आणि बोर्डामधील वादामुळे आमच्या टी-२० वर्ल्डकपमधील सहभागाबद्दल शंका होती. आमच्याच बोर्डाने आमचा अनादर केल्याची खेळाडूंची भावना आहे असे वादग्रस्त विधान केले होते.
सॅमीने यावेळी डोक नसलेल्या क्रिकेटपटूंचा संघ म्हणून टीका करणारे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक मार्क निकोलस यांचाही समाचार घेतला होता. मार्क यांच्या टीकेमुळे संघ अधिक जवळ आला असे त्याने सांगितले.