वेस्ट इंडिजकडून झालेला पराभव धडा देणारा : आर्थर
By admin | Published: November 5, 2016 05:34 AM2016-11-05T05:34:42+5:302016-11-05T05:34:42+5:30
अखेरच्या कसोटीत झालेल्या पराभवावर निराश झालेले पाकिस्तान संघाचे कोच मिकी आर्थर यांनी हा पराभव संघासाठी डोळे उघडणारा
शारजाह : वेस्ट इंडिजकडून तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत झालेल्या पराभवावर निराश झालेले पाकिस्तान संघाचे कोच मिकी आर्थर यांनी हा पराभव संघासाठी डोळे उघडणारा असून पुढील मालिकेपूर्वी सुधारणेस वाव असेल, असे म्हटले आहे.
पाकने विंडीजविरुद्ध मालिका २-१ ने जिंकली, पण अखेरच्या सामन्यातील पराभव निराशादायी ठरला. आर्थर म्हणाले, ‘या पराभवानंतर आम्हाला तयारीचा फेरआढावा घ्यावा लागेल. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असल्याने चुकांपासून बोध घेत खेळ उंचावावा लागेल.’ विंडीजचा हा १४ कसोटीतील पहिलाच विजय ठरला. पाकला न्यूझीलंडविरुद्ध दोन कसोटी सामने १७ आणि २५ नोव्हेंबरपासून खेळायचे आहेत. आॅस्ट्रेलयाविरुद्ध डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामने खेळायचे आहेत.
आर्थर म्हणाले, ‘आमच्यासाठी हा डोळे उघडायला लावणारा पराभव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तुम्ही कुठलीही श्थििलता बाळगू शकत नाही, हे देखील श्किण्यासारखे आहे. शिस्तबद्ध कामगिरी करणार नसाल तर पराभवाची शक्यता अधिक असते हे यातून निष्पन्न झाले. आम्ही खेळातून बोध घेऊ. खेळाचा स्तर उंचावणे प्रत्येक खेळाडूची जबाबदारी आहे, हे ध्यानात ठेवून सर्वांनी प्रयत्न करायलाच हवे.’ (वृत्तसंस्था)