वेस्ट इंडिजकडून झिम्बॉब्वे पराभूत

By admin | Published: February 24, 2015 05:13 PM2015-02-24T17:13:37+5:302015-02-24T17:13:37+5:30

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या झंझावती दुहेरी शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने झ‍िम्बॉब्वेचा ७३ धावांनी पराभव केला.

West Indies defeats Zimbabwe | वेस्ट इंडिजकडून झिम्बॉब्वे पराभूत

वेस्ट इंडिजकडून झिम्बॉब्वे पराभूत

Next

ऑनलाइन लोकमत

कॅनबेरा, दि. २४ - वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या झंझावती दुहेरी शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने झ‍िम्बॉब्वेचा ७३ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडिजच्या सलामीला आलेल्या ख्रिस गेल व सॅम्यूअल या जोडीने तुफानी फलंदाजींचे दर्शन घडवले. झिम्बॉब्वेच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई करीत ख्रिस गेलने वर्ल्डकपमधील ऐतिहासिक दुहेरी शतक झळकाविले. ख्रिस गेलने १४७ चेंडूत २१५ धावा केल्या. ख्रिस गेलने १६ षटकार व १० चौकार सीमापार धाडले. ख्रिस गेलसोबत सलामीला आलेल्या सॅम्यूअलनेही तुफानी फलंदाजी केली. १५६ चेंडूत त्याने १३३ धावा चोपल्या. यावेळी त्याने ११ चौकार व ३ उत्तूंग षटकार ठोकले. या दोन फलंदाजांनी रचलेल्या ऐतिहासिक भागिदारीमुळे वेस्ट इंडिज संघाने २ बाद ३७२ धावसंख्या रचली. ही धावसंख्या २०१५ च्या वर्ल्डकपमधील आत्तापर्यंतची सवार्धिक धावसंख्या ठरली. वेस्ट इंडिजने रचलेल्या ३७२ धावसंख्येचा पाठलाग करणा-या झिम्बॉब्वेची फलंदाजी अपयशी ठरली. सलामीला आलेली जोडी स्वस्तात बाद झाली. झिम्बॉब्वेकडून विल्यम्सने सर्वाधिक ७६ धावा केल्या. झिम्बॉब्वेचा संघ ४४.३ षटकांत २८९ धावांवर सर्वबाद झाला. वेस्ट इंडिजकडून टेलर व होल्डरने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले तर मिल्लर व सॅम्यूअल्सला १-१ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Web Title: West Indies defeats Zimbabwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.