वेस्ट इंडिजला गुंडाळले

By admin | Published: July 31, 2016 01:32 AM2016-07-31T01:32:46+5:302016-07-31T01:32:46+5:30

५ बळींच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी ५२.३ षटकांत केवळ १९६ धावांत गुंडाळले.

West Indies wrapped up | वेस्ट इंडिजला गुंडाळले

वेस्ट इंडिजला गुंडाळले

Next


किंग्स्टन : भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ५२ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी ५२.३ षटकांत केवळ १९६ धावांत गुंडाळले. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन तर अमित मिश्राने एक बळी घेत अश्विनला मदत केली. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वाेत्तम ठरली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.
सबीना पार्कच्या हिरव्यागार पीचवर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डनचा नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. ईशांत तिसऱ्या षटकांतच सलग दोन बळी घेतले. अवघ्या ६ षटकांत विंडीजने ३ फलंदाज गमावले. दोन धक्क्यांमुळे विंडीजची अवस्था ६ षटकांत ११ धावांत ३ बळी, अशी झाली होती. सलामीवर ब्रेथवेट १, तर ब्राव्होला एकही धाव काढता आली नाही. दोघेही ईशांतचे बळी ठरले.
तिसरा धक्का मोहंमद शमीने दिला. त्याने चंद्रिकाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्लाेन सॅम्युअल्स (१४) आणि जर्मेइन ब्लॅकवूड (६२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये ब्लॅकवूडने महत्त्वपूर्ण ६२ धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी त्याला अश्विनने पायचित केले. जलदगती गोलंदाजांनी आघाडीची फळी कापून काढल्यानंतर विंडीजच्या उर्वरित संघाला रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात गुरफटवले.
भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी लोकेश राहुल याला संधी दिली. तर, होल्डरने कार्लाेस ब्रेथवेटच्या जागी मिगेल कमन्सिला संधी दिली.
>धावफलक
वेस्ट इंडीज पहिला : ब्रेथवेट झे पुजारा गो. शर्मा १, चंद्रिका झे राहुल गो. शमी ५, ब्राव्हो झे कोहली गो. शर्मा ०, सॅम्युएल झे. राहुल गो. अश्विन ३७, ब्लॅकवूड पायचीत अश्विन ६२, चेस झे. धवन गो. मोहम्मद शमी १0, डोवरिच यष्टीचीत साहा गो. अश्विन ५, होल्डर झे राहुल गो. अश्विन १३, बिशू झे धवन गो. अश्विन १२, कमिन्स नाबाद २४, गॅब्रिएल झे कोहली गो मिश्रा १२.
गोलंदाजी : ईशांत शर्मा १०-१-५३-२, मोहंमद शमी १0-३-२३-२, अश्विन १६-२-५२-५, उमेश यादव ६-१-३०-०, अमित मिश्रा १0.३-३-३८-१.

Web Title: West Indies wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.