वेस्ट विंडीजचा विश्वविजेतेपदाचा जल्लोष....

By admin | Published: April 3, 2016 10:34 PM2016-04-03T22:34:43+5:302016-04-03T23:46:27+5:30

मर्लोन सॅम्युअल्सच्या ८५ धावांच्या मॅचविनींग खेळीच्या जोरावर आणि डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने साहेबांना ४ विकेटने लोळवले.

West Windies World Cup Winners ... | वेस्ट विंडीजचा विश्वविजेतेपदाचा जल्लोष....

वेस्ट विंडीजचा विश्वविजेतेपदाचा जल्लोष....

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ३ - मर्लोन सॅम्युअल्सच्या ८५ धावांच्या मॅचविनींग खेळीच्या जोरावर आणि डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने साहेबांना ४ विकेटने लोळवले. इंग्लंडने विंडीजसमोर २० षटकांखेर १५६ धावांचे आव्हान ठेवले. १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरवात निराश जनक झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत सुरुवातीच्या पाच षटकांतच वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद २८ अशी केली आहे. ज्यो रुटने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमक दाखवित विंडीजच्या सलामीवीरांना बाद केले. ज्यो रुटने याने या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत दोन बळी घेतले. सलीमीवीर चार्ल्स व धडाकेबाज विस्फोटक फलंदाज फ्रिस गेलला तंबुचा रस्ता दाखवला. डेविड विलीने १५ षटकात वेस्ट इंडिजच्या २ फलंदाजांना बाद केले त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली पण कार्लोस ब्रेथवेट  ने शेवटच्या षटकात १९ धावांची गरज असताना सलग चार षटकार लगावत २४ धावा वसूल केल्या आणि विडिंजला टी २० चे दुसरे विजेतेपद मिळवून दिले.
 
कॅरेबियन खेळाडूंचा विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष....
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
त्यापुर्वी, 
शिस्तबद्ध गोंलदाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने इंग्लडंला चांगलेच झुलवले, वेस्ट विंडिजच्या तगड्या गोंलदाजी पुढे निर्धारिती २० षटकात इंग्लंडला ९ बाद १५५ धावापंर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडिजतर्फे डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी इंग्लंडच्या ३ फलंदाजांना बाद केले तर सॅम्युअल बद्रीने २ फंलदाजांची शिकार केली. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळला जात आहे. या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरन सॅमीने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सॅमीने सलग दहाव्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. 
 
 
जो रूट (५४) आणि जोस बटलर (३६) यांच्या धमाकेदार खेळीच्या बळावर इंग्लंडने निर्धारित २० षटकात १५५ धावा केल्या. त्यामुळे टी २० विश्वचषक जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला १५६ धावांची गरज आहे. इंग्लंडची सुरवात आतिशय निराशजनक झाली, त्यांना सुरवातीच्या पहिल्या पाच षटकातच  तीन धक्के बसले. पाच षटकात इंग्लंडने तीन बाद २३ धावा केल्या होत्या. पहिल्या षटकाच्या दुस-याच चेंडूवर शून्यावर इंग्लंडला पहिला धक्का बसला.
 
सलामीवीर रॉयच्या बद्रीने शून्यावर यष्टया वाकवल्या. उपांत्यफेरीत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रॉय इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्यानंतर हेल्सला एका धावेवर रसेलने बद्रीकरवी झेलबाद केले. कर्णधार मॉर्गनला ५ धावांवर बद्रीने गेलकरवी झेलबाद केले. रुट आणि बटलर यांनी चौथ्या गड्यासाठी ६.४ षटकात ६१ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या वेगाने वाढवली.
 

Web Title: West Windies World Cup Winners ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.