लाज वाटायला हवी; भारतीय खेळाडूच्या आजीचं निधन अन् नेटिझन्सकडून वर्णद्वेषी टीका!

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 01:49 PM2021-02-12T13:49:13+5:302021-02-12T13:49:38+5:30

कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या.

What has happened to us as a society...where’s the empathy, Jwala Gutta criticize to trollers | लाज वाटायला हवी; भारतीय खेळाडूच्या आजीचं निधन अन् नेटिझन्सकडून वर्णद्वेषी टीका!

लाज वाटायला हवी; भारतीय खेळाडूच्या आजीचं निधन अन् नेटिझन्सकडून वर्णद्वेषी टीका!

Next

कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. भारताची दुहेरीतील स्टार खेळाडू ज्वालानंही तिच्या स्वभावानुरूप नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले. पण, आता ट्रोलर्सनी हद्दच केली. ज्वाला गुट्टानं तिच्या आजीच्या निधनाची ( grand mom who passed away) बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. पण, तिला काही नेटिझन्सनी ट्रोल केलं आणि त्यावर ज्वालानं सहानुभूती कुठेय? असा सवाल विचारत राग व्यक्त केला. चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

ज्वालानं ट्विट केलं की,''माझ्या आजीचं चीनमध्ये निधन झालं. माझी आई प्रत्येक महिन्याला तिला भेटायला जाते, परंतु कोव्हिडमुळे गेले वर्षभर तिला जाता आलं नाही. आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत घालवलेला वर्तमान किती महत्त्वाचे आहे, हे या कोव्हिडनं आपल्याला शिकवलं.''  हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज


ज्वालानं या पोस्टमध्ये कोव्हिड असा उल्लेख केल्यानं काहींनी तिला कोव्हिड की चायनीस व्हायरस? असा सवाल विचारला. ज्वालानं एका ट्विटचं स्क्रीनशॉट पोस्ट करून वर्णद्वेषी टीकेबद्दल सांगितले.  

तिनं लिहिलं की,''माझ्या आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना माझ्यावर वर्णद्वेषी टीका होताना पाहून मला धक्काच बसला. या समाजात काय चाललं आहे. सहानुभूती कुठे हरवली आहे, आपण कोणत्या दिशेनं जात आहोत?, लाज वाटायला हवी.''  BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

Web Title: What has happened to us as a society...where’s the empathy, Jwala Gutta criticize to trollers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.