कुजबुज

By Admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:13+5:302014-12-20T22:27:13+5:30

असेही स्वागत!

Whisper | कुजबुज

कुजबुज

googlenewsNext
ेही स्वागत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत येणार म्हटल्यावर वातावरण ज्या पध्दतीचे असायला हवे होते तसे ते जायंट्स इंटरनॅशनलच्या अधिवेशनात दिसले नाही. याबाबतीत संघाच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झालाच शिवाय भागवतांच्या चाहत्यांनाही ते म्हणे खटकले. दोनापावलच्या कम्युनिटी हॉलमध्ये प्रवेशद्वारावरच स्वागतासाठी पाश्चात्य पध्दतीचे बॅण्ड लावले होते. कार्निव्हलला मुखवटे लावतात तसे या आवारात ठिकठिकाणी मुखवटे लावण्यात आले होते. प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर मात्र सुवासिनींकडून मंत्रोच्चार आणि ओवाळणी झाली. बाहेर जसे पाश्चात्य पध्दतीचे वातावरण होते तसेच व्यासपीठावरही. सुटाबुटातील मान्यवरांमध्ये भागवतांनाही अवघडल्यासारखे झाले असावे नाही का?

पंढरीला नव्हे, कोलंबोला जाऊ!
गोमंतकीय सुपुत्र फादर जुझे वाझ यांना संतपद बहाल करण्याच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी जाणार्‍यांना विमानभाड्याचे १२ हजार रुपये सरकार देणार आहे, अशी घोषणा झालेली आहे. काही हिंदुत्ववाद्यांनी ही घोषणा बरीच खटकली आहे. पंढरपूरला विमानसेवा नाही म्हणून का सरकार आम्हाला विमान भाडे देत नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे. नाहीतरी अनेकदा सरकारच्या घोषणा या केवळ नावापुरत्या असतात. भाविकांना शिर्डी, पंढरपूरला जाता यावे यासाठी सरकारकडून खर्चाचा भार उचलण्याची अधिसूचना काढली; परंतु त्याचा लाभ कोणा भाविकाला मिळाल्याचे अजून तरी ऐकिवात नाही किंवा सरकारनेही तशी माहिती जाहीर केलेली नाही.

Web Title: Whisper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.