स्पेनकडून भारताला व्हाईट वॉश

By admin | Published: September 19, 2016 03:58 AM2016-09-19T03:58:37+5:302016-09-19T03:58:37+5:30

युवा टेनिसपटू सुमित नागलने आपले पदार्पण चांगलेच गाजविले; परंतु तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही.

White wash from Spain for India | स्पेनकडून भारताला व्हाईट वॉश

स्पेनकडून भारताला व्हाईट वॉश

Next


नवी दिल्ली : युवा टेनिसपटू सुमित नागलने आपले पदार्पण चांगलेच गाजविले; परंतु तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत रविवारी स्पेनकडून भारताला 0-५ असा पराभव पत्कारावा लागला.
आॅलिम्पिक चॅम्पियन आणि फ्रेंच दुहेरीचा विजेत्या स्पेनच्या मार्क लोपेजविरुध्द भारताच्या १९ वर्षीय सुमित नागलने सामन्यात दबदबा निर्माण केला होता; परंतु सामन्यात त्याला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. दोन तासाहून अधिक वेळ चाललेल्या सामन्यात लोपेजने ६-३, १-६, ६-३ असा विजय मिळविला.
भारताचा पाचवा सामना रामकुमार रामनाथनने खेळला. या सामन्यात त्याचा प्रतिस्पर्धी होता जागतिक मानांकनात १३ व्या स्थानी असलेला डेव्हीड फेरर. त्यामुळे भारताचा व्हाईट वॉश नक्की होता. फेररने ६-२, ६-२ असा सहजपणे सामना खिशात घातला आणि भारताच्या व्हाईट वॉशवर शिक्कामोर्तब केले. स्पेनने कालच ३-0 अशी विजयी आघाडी घेतल्यामुळे आजचे दोन सामने तसे निरर्थकच होते. स्पेनने परतीच्या एकेरी सामन्यात फेलिशियानो लोपेजच्या जागी मार्क लोपेजला उतरवले, तर भारताने नागलला पदार्पणाची संधी दिली. २00३ मध्ये भारताला व्हाईट वॉशचा सामना करावा लागला होता. नेदरलँडने त्यांना हरविले होते. व्हाईट वॉश पत्करण्याची ही भारताची २१ वी वेळ आहे.
>दोन वर्षांनंतर ‘एलिट ग्रुप’मध्ये स्पेनचे पुनरागमन
नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून डेव्हिस चषकात सुमार कामगिरी आणि आपसातील मतभेदामुळे विश्व ग्रुपमधून बाहेर राहणाऱ्या बलाढ्य स्पेन संघाने राफेल नदालच्या नेतृत्वाखाली पुन्हा ‘एलिट ग्रुप’मध्ये पुनरागमन केले आहे.
भारताविरुद्ध ३-0 अशा निर्णायक आघाडीनंतर विश्व ग्रुपमध्ये पोहोचणारा स्टार खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत राफेल नदालनेदेखील त्यांचा राष्ट्रीय संघ आता पुन्हा ज्या जागी असायला हवा त्या स्थानावर आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. १४ वेळेचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने म्हटले, ‘आमच्यासाठी विजय खूप महत्त्वाचा आहे. कारण दोन वर्षे विश्व ग्रुपमधून बाहेर राहिल्यानंतर आम्ही पुनरागमन करीत आहोत. आम्हाला तेथे पोहोचणे खूप महत्त्वाचे आहे.’

Web Title: White wash from Spain for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.