बीसीसीआयचा नवीन कर्णधार कोण?

By Admin | Published: September 21, 2015 11:59 PM2015-09-21T23:59:52+5:302015-09-21T23:59:52+5:30

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आमसभेची विशेष बैठक बोलविणे आवश्यक आहे

Who is the new captain of the BCCI? | बीसीसीआयचा नवीन कर्णधार कोण?

बीसीसीआयचा नवीन कर्णधार कोण?

googlenewsNext

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आमसभेची विशेष बैठक बोलविणे आवश्यक आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीसीसीआयच्या घटनेतील कलम ‘१६ ड’नुसार अध्यक्षाचे निधन झाल्यानंतर बोर्डाच्या सचिवांना आमसभेची विशेष बैठक बोलविण्याचा नोटीस जाहीर करण्याचा अधिकार आहे. २१ दिवसांच्या आत या बैठकीचे आयोजन होणे आवश्यक आहे. त्यात अंतरिम अध्यक्षाची निवड होईल.’
बीसीसीआयची सध्याची स्थिती बघता अध्यक्षाची निवडणूक किंवा निवड करणे सोपे नाही. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. शुक्ला यूपीसीएचे अध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांना पूर्व विभागातील संलग्न राज्य संघटनांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. पूर्व विभागाचे उपाध्यक्ष गौतम राय दावेदार ठरू शकतात. पाच उपाध्यक्षांमध्ये ते सर्वांत सीनिअर आहेत. १९९२ मध्ये ग्वाल्हेरमध्ये झालेल्या आमसभेमध्ये त्यांची निवड झाली होती. रॉय यांना बीसीसीआयकडून अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. दिल्लीच्या के. सी. खन्ना यांचीही स्थिती अशीच आहे. ते मध्य विभागाचे उपाध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार ठाकूर यांना नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी आमसभेची विशेष बैठक बोलवावी लागेल; पण त्यांना या बैठकीचे आयोजन करता येईल किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच कार्यसमितीच्या बैठकीची पुढील तारीख निश्चित होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Who is the new captain of the BCCI?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.