ज्याने फिलिप ह्यूजला वाचवले

By admin | Published: November 27, 2014 12:47 AM2014-11-27T00:47:55+5:302014-11-27T00:47:55+5:30

आता पुन्हा एकदा आर्चर्ड ‘हिरो’ बनले आहेत. त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अजूनही फिलिफ ह्यूज जिवंत आहे.

Who saved Philip Hughes | ज्याने फिलिप ह्यूजला वाचवले

ज्याने फिलिप ह्यूजला वाचवले

Next
आता पुन्हा एकदा आर्चर्ड ‘हिरो’ बनले आहेत. त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अजूनही फिलिफ ह्यूज जिवंत आहे. अॅबॉटच्या चेंडूवर जखमी होऊन ह्यूज मैदानावर पडल्यानंतर आर्चर्ड सर्वात प्रथम धावत मैदानावर आले होते. ऑर्चर्ड हे आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. 
त्यांनी मैदानावर आल्याबरोबर ह्यूजला कृत्रिम श्वासोच्छवास (माऊथ टू माऊथ) आणि सीआरआर सुरू केले. ह्यूजला मैदानावरून सीमारेषेबाहेर नेईर्पयत आर्चर्डचे प्रयत्न सुरूच होते. कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी ऑर्चर्ड यांनीच ह्यूजच्या शरीरात नळी घातली. अॅम्बुलन्स आणि हेलिकॉप्टरमध्ये बसवेर्पयत ऑर्चर्ड यांनी ह्यूजची काळजी घेतली. 
ह्यूजच्या अॅम्बुलन्समधूनच सेंट व्हिन्सेट रुग्णालयात जाऊन आर्चर्ड मंगळवारी रात्री उशिरार्पयत थांबले होते आणि बुधवारी सकाळी पुन्हा ते रुग्णालयात हजर होते. 
 
जॉन आर्चर्ड गेल्या दहा वर्षापासून न्यू साउथ वेल्स या संघाचे डॉक्टर म्हणून काम पाहत आहेत. एका स्थानिक रग्बी सामन्यावेळी माईक डी व्हेर या खेळाडूला झालेल्या दुखापतीवेळी ऑर्चर्ड यांनी त्याच्यावर स्टेपलरने  टाके घातले होते. या प्रकारामुळे ते चर्चेत आले होते.

 

Web Title: Who saved Philip Hughes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.