तिसरा कोण? आज ठरणार
By admin | Published: July 12, 2014 01:04 AM2014-07-12T01:04:56+5:302014-07-12T01:04:56+5:30
जर्मनीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर विश्वचषक स्पध्रेतील उरलेली प्रतिष्ठा वाचविण्याच्या प्रयत्नात असलेला ब्राझील तिस:या स्थानावर दावा सांगण्यासाठी नेदरलँडशी सामना करणार आहे.
Next
कर्णधार सिल्वा खेळणार : ब्राझीलच्या प्रतिष्ठेला ऑरेंज आर्मीचे चॅलेंज
ब्राङिालिया : जर्मनीकडून लाजिरवाण्या पराभवानंतर विश्वचषक स्पध्रेतील उरलेली प्रतिष्ठा वाचविण्याच्या प्रयत्नात असलेला ब्राझील तिस:या स्थानावर दावा सांगण्यासाठी नेदरलँडशी सामना करणार आहे.
स्टार स्ट्रायकर नेमार आणि कर्णधार थिएगो सिल्वा यांच्या अनुपस्थितीत ब्राझीलला उपांत्य फेरीत जर्मनीकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला होता. 7-1 अशा पराभवानंतर ब्राझीलचे सहाव्यांदा विश्वचषक पटकावण्याचे आणि घरच्या मैदानावर पहिल्यांदा जेतेपदाचा आस्वाद लुटण्याचे स्वप्न नेस्तनाबूत झाले. त्या पराभवानंतर ब्राझीलमध्ये अo्रूंचा बांध फुटला होता. त्यामुळे तिस:या आणि चौथ्या स्थानासाठी उद्या, शनिवारी मध्यरात्री होणा:या या लढतीत विजय साजरा करून यजमान त्या दु:खावर आनंदाची थोडीसी झालर चढविण्याच्या प्रय}ात असतील. थिएगो सिल्वा एक सामन्याच्या बंदीनंतर नेदरलँडविरुद्धच्या लढतीत खेळणार असल्याने ब्राझीलची कमकुवत बचावफळी मजबूत होणार आहे. या कमकुवत बचावफळीमुळेच ब्राझीलला उपांत्य फेरीत पहिल्या हाफमध्ये 5 गोल्स स्वीकारावे लागले होते. त्यामुळे उद्याच्या या लढतीत ब्राझीलला विजय मिळविणो आवश्यक आहे. या लढतीनंतर संघाचे प्रशिक्षक लुईस स्कोलारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे उपांत्य फेरीत अर्जेटिनाला झुंजवूनही पदरी पराभव आलेला ऑरेंज आर्मीही विजयासाठी उत्सुक असेल. परंतु, नेदरलँडचे प्रशिक्षक लुई वॅन गाल यांच्यासाठी ही लढत इतकी महत्त्वाची नाही. गेल्या दहा वर्षापासून त्यांचा या तिस:या-चौथ्या स्थानासाठी होणा:या लढतीला विरोध आहे. ते म्हणाले, या स्पर्धेतील सर्वात निराशाजनक बाब ही की, तुम्ही सलग दोन सामने पराभूत होता. या स्पध्रेत तुम्ही चांगली कामगिरी करून इथवर मजल मारली आणि घरी परतताना दोन पराभव पदरी पडतात. त्यामुळे या सामन्याचे खास महत्त्व नाही. (वृत्तसंस्था)
12 व्यांदा ब्राझील आणि नेदरलँड आमने-सामने येत आहेत. आतार्पयत दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन विजय साजरे केले असून, 5 लढती अनिर्णीत राहिल्या.
05 व्यांदा दोन्ही संघ विश्वचषकात भिडत असून, नेदरलँडने दोन विजय साजरे केले आणि एकात पराभव पत्करला.
02 वेळा नेदरलँडने 1974 व 78 नंतर विश्वचषकात अव्वल चार संघांमध्ये स्थान पटकावले आहे.
12 गोल्स या स्पध्रेत नेदरलँडने नोंदविले असून, उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत त्यांना निर्धारित वेळेत गोल करण्यात अपयश आले.
04 वेळा ब्राझील तिस:या-चौथ्या स्थानासाठी भिडणार असून, 1978नंतर ही त्यांची पहिलीच वेळ आहे. त्यातील दोन सामने त्यांनी जिंकले असून, एकात पराभव पत्करला आहे.
नारंगी दिवार
ब्राझील भेदणार का?
उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीकडून 7-1 असा दारुण पराभव झालेल्या ब्राझीलला तिस:या स्थानासाठी नेदरलँडशी लढायचे आहे. ही नारंगी दिवार भेदून प्रतिष्ठा वाचविण्याचे आव्हान ब्राझीलपुढे असणार आहे.