या पराभवासाठी संपूर्ण संघ जबाबदार!
By admin | Published: August 16, 2015 10:44 PM2015-08-16T22:44:36+5:302015-08-16T22:44:36+5:30
पराभवाचे खापर कोणा एका खेळाडूवर न फोडता त्याने संपूर्ण संघाला जबाबदार ठरवले आहे. कोहली म्हणाला की, दुसऱ्या डावात लंकेला ५ बाद ९५ धावांवर
Next
गाले: पराभवाचे खापर कोणा एका खेळाडूवर न फोडता त्याने संपूर्ण संघाला जबाबदार ठरवले आहे. कोहली म्हणाला की, दुसऱ्या डावात लंकेला ५ बाद ९५ धावांवर कोंडित पकडले होते. येथेच पकड आणखी घट्ट करणे गरजेचे होते.
चंडिमलने येथून सामना फिरवला. परिस्थितीचा फायदा उचलण्यात आम्ही अयशस्वी ठरलो. लंका संघाचे अभिनंदन करताना कोहलीने रंगना हेराथचे कौतुक करताना सांगितले की, हेराथ उत्कृष्ट गोलंदाज असून त्याने भारतीय फलंदाजांवर सातत्याने दबाव ठेवला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचलित होता कामा नये. संघ नेमका याबाबतीत मागे राहिला. दबावामध्ये खेळणे आवश्यक आहे, असे सांगतानाच कोहलीने संघ मानसिकरीत्या कमजोर ठरला म्हटले.