‘बीसीसीआय’कडून ब्रिटिशकालीन बोधचिन्हांचा अजूनही वापर का?

By Admin | Published: June 19, 2017 01:03 AM2017-06-19T01:03:03+5:302017-06-19T01:03:03+5:30

वसाहतीच्या राजवटीत ब्रिटिश त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या व आवडीच्या राजाला सन्मान म्हणून ‘स्टार आॅफ इंडिया’ पदक द्यायचे.

Why BCCI still use British terminology? | ‘बीसीसीआय’कडून ब्रिटिशकालीन बोधचिन्हांचा अजूनही वापर का?

‘बीसीसीआय’कडून ब्रिटिशकालीन बोधचिन्हांचा अजूनही वापर का?

googlenewsNext

नवी दिल्ली : वसाहतीच्या राजवटीत ब्रिटिश त्यांच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या व आवडीच्या राजाला सन्मान म्हणून ‘स्टार आॅफ इंडिया’ पदक द्यायचे. या पदकासारखे दिसणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) बोधचिन्ह (लोगो) भारतीय क्रिकेट संघ आजही वापर का करीत आहे, अशी विचारणा केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) पंतप्रधान कार्यालय, खेळ व कायदा मंत्रालयाला केली आहे.
ब्रिटिश राजवटीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्टार आॅफ आॅर्डरप्रमाणे बीसीसीआयचे हे बोधचिन्ह आहे, असे आयोगाने म्हटले. भारतात स्वातंत्र्यासाठी १८५७ मध्ये पहिले युद्ध (बंड) झाल्यानंतर ब्रिटिश राजघराण्याने भारतावरील आपले सार्वभौमत्व घट्ट करण्यासाठी आपल्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या भारतीय राजांचा सन्मान करण्यासाठी स्टार आॅफ इंडिया हा नवा सन्मान बहाल करायला प्रारंभ केला. वसाहतीच्या काळातील हा वारसा बीसीसीआय आजही मिरवत आहे ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही का, आजही क्रिकेट संघ हे बोधचिन्ह मिरवत आहे, असे आयोगाने म्हटले.
बीसीसीआयने हे बोधचिन्ह बदलून त्याऐवजी देशाचा तिरंगा ध्वज किंवा चार सिंह किंवा अशोक धर्म चक्र किंवा सरकारने निवडलेले इतर कुठलेही चिन्ह का घेतले नाही, अशी विचारणाही आयोगाने केली आहे. बीसीसीआयला माहितीच्या अधिकार कायद्याखाली आणण्याबद्दल लोकसभेत सांगण्यात आल्यानंतरही सरकार का आणत नाही याचा खुलासा आयोगाने या अधिकाऱ्यांकडून मागितला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Why BCCI still use British terminology?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.