‘त्या’ वादाचा व्हिडिओ का नाही?

By admin | Published: July 21, 2014 02:02 AM2014-07-21T02:02:37+5:302014-07-21T02:02:37+5:30

भारत आणि इंग्लंड क्रिकेट संबंधामध्ये वादळ निर्माण करणाऱ्या रवींद्र जडेजा व जेम्स अँडरसन वादाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ने प्रश्न उपस्थित केला आहे.

Why not a video of 'that' debate? | ‘त्या’ वादाचा व्हिडिओ का नाही?

‘त्या’ वादाचा व्हिडिओ का नाही?

Next

लंडन : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संबंधामध्ये वादळ निर्माण करणाऱ्या रवींद्र जडेजा व जेम्स अँडरसन वादाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्यामुळे ‘बीसीसीआय’ने प्रश्न उपस्थित केला आहे. जडेजासोबत कथित प्रकरणात इंग्लंडचा क्रिकेटपटू अँडरसनने धक्काबुक्की केली आणि शिवराळ भाषेचा वापर केला. या वादाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीला झळ बसली आहे. भारतीय संघाने नॉटिंघम कसोटीदरम्यान घडलेल्या या घटनेची ‘आयसीसी’कडे तक्रार केली आहे. या प्रकरणी मंगळवारी अँडरसनची प्राथमिक चौकशी होणार आहे.

Web Title: Why not a video of 'that' debate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.