इंग्लंडविरुद्ध डिव्हिलियर्स करणार यष्टिरक्षण

By admin | Published: December 11, 2015 12:07 AM2015-12-11T00:07:26+5:302015-12-11T00:07:26+5:30

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांत एबी डिव्हिलियर्स हा यजमान संघाचा यष्टिरक्षक असेल.

The wicketkeeper for England against England | इंग्लंडविरुद्ध डिव्हिलियर्स करणार यष्टिरक्षण

इंग्लंडविरुद्ध डिव्हिलियर्स करणार यष्टिरक्षण

Next

केपटाऊन : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांत एबी डिव्हिलियर्स हा यजमान संघाचा यष्टिरक्षक असेल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन्ही सामन्यांसाठी १३ सदस्यांचा संघ जाहीर केला. डिव्हिलियर्सकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. मागच्या सत्रात त्याने विंडीजविरुद्ध यष्टिरक्षण केले होते.
भारताविरुद्ध नुकत्याच संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळलेले क्विंटन डी कॉक आणि डेन विलास यांना खराब कामगिरीमुळे संघातून डच्च्यू देण्यात आला. मात्र, हे दोन्ही खेळाडू अ संघात स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.
संघात डिव्हिलियर्ससह डीन एल्गर, स्टीवन वॉन झील, तेम्बा बावुमा, यांच्यासह अतिरिक्त फलंदाज म्हणून रिली
रोसो याला स्थान
देण्यात आले. डेन
पीएट हा संघात
एकमेव फिरकी गोलंदाज आहे. काइल एबोट,
डेल स्टेन, कॅसिगो रबाडा आणि मोर्ने मोर्केल
हे गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: The wicketkeeper for England against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.