पत्नी खूश तर, नो टेंन्शन - शिखर धवन

By Admin | Published: June 14, 2017 02:47 PM2017-06-14T14:47:25+5:302017-06-14T14:47:25+5:30

क्षिण आफ्रिकेचा अडथळा पार करुन उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू खेळाबरोबच आपल्या कुटुंबासोबतही हलकेफुलके क्षण एन्जॉय करत आहेत.

Wife happy, no tension - Shikhar Dhawan | पत्नी खूश तर, नो टेंन्शन - शिखर धवन

पत्नी खूश तर, नो टेंन्शन - शिखर धवन

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. 14 - दक्षिण आफ्रिकेचा अडथळा पार करुन उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय संघातील क्रिकेटपटू खेळाबरोबरच आपल्या कुटुंबासोबतही हलकेफुलके क्षण एन्जॉय करत आहेत. इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघातील विवाहीत क्रिकेटपटूंसोबत त्यांच्या पत्नीही आहेत. शिखर धवनने लंडनहून बर्मिंगहॅमला जाताना आपल्या टीममधील सहका-यांसोबत काढलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 
 
या फोटोमध्ये स्वत: शिखर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे त्यांच्या पत्नींसोबत आहेत. शिखरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोच्या बाजूला "बिविया सेट  मतलब सब सेट" अशी कॅप्शनची ओळ लिहीली आहे. सध्या इंग्लंडमध्ये शिखरने आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दहशत निर्माण केली आहे. शिखर भले मैदानावर कितीही आक्रमक असला तरी, पत्नीसमोर मात्र नेमस्तच असल्याचे त्याने संकेत दिले आहेत. या फोटोच्या निमित्ताने त्याचा खटयाळपणा, विनोदी अंग समोर आले आहे. शिखर सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून तीन सामन्यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकवली आहेत. 
 
आणखी वाचा 
 
पाकिस्तान विरुद्ध 68, श्रीलंके विरुद्ध 125 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 78 धावांची खेळी केली. बर्मिंगहॅममध्ये बांगलादेश विरुद्धही हाच फॉर्म कायम राखण्याचा धवनचा प्रयत्न असेल. दक्षिणआफ्रिके विरुद्ध मोठा विजय मिळाल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे. गुरुवारी बांगलादेशवर मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. बांगलादेश विरुद्ध सामना असला तरी, आम्ही ही लढत हलक्यामध्ये घेणार नाही असे कर्णधार विराट कोहलीने सांगितले. यापूर्वी आम्ही बर्मिंगहॅममध्ये खेळलो आहोत. आम्हाला ती खेळपट्टी आवडली होती. आम्हाला अनुकूल पीच आहे असे विराट कोहली म्हणाला. 
 
विराट म्हणतो, इंग्लंडसोबत व्हावी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल
 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी चॅंम्पियन्स  ट्रॉफीमधील उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत.  त्यातच भारतापाठोपाठ पाकिस्तानचा संघही उपांत्य फेरीत पोहोचल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना अंतिम फेरीत पुन्हा एकदा  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचा थरार अनुभवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र पाकिस्तान नव्हे तर इंग्लंडबरोबर अंतिम लढत व्हावी, असे वाटते. 

Web Title: Wife happy, no tension - Shikhar Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.