ओल्टमन्स यांच्या कामगिरीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 02:38 AM2017-07-27T02:38:39+5:302017-07-28T13:05:13+5:30
विश्व हॉकी लीगमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्यावर कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : विश्व हॉकी लीगमधील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांच्यावर कुºहाड कोसळण्याची शक्यता आहे. ओल्टमन्स यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ‘हॉकी इंडिया’ने समिती स्थापना केली. समितीचा अहवाल येताच कोचचे भवितव्य ठरणार आहे. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स संचालक’ डेव्हिड जॉन हे या समितीचे अध्यक्ष असतील. आशियाई खंडातील देशांसोबत खेळताना भारतीय संघ मैदानात उत्तम खेळ करतो. मात्र युरोपियन संघासमोर भारताची त्रेधातिरपिट होते. आपल्यापेक्षा वरचढ संघाविरुद्ध खेळताना ओल्टमन्स यांच्याकडे पर्यायी योजना नसल्याचे हॉकी इंडियाच्या अधिकाºयांना वाटते. रिओ आॅलिम्पिकमध्ये चांगली सुरुवात केलेल्या भारतीय संघाने बेल्जियमविरुद्ध नांगी टाकली होती. सुलतान अझलान शाह आणि विश्व हॉकी लीगमध्येही मलेशियाने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. शिवाय कॅनडानेही विजय नोंदविताच भारताची दाणादाण झाली होती. माजी प्रशिक्षक पॉल अॅन वास यांच्या राजीनाम्याच्या वेळी हॉकी इंडियावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळेच कोचच्या कामगिरीचे आॅडिट म्हणून विश्व हॉकी लीगमधील भारताच्या खराब कामिगरीचा आढावा घेण्यात येणार असून, जे खेळाडू सतत खराब कामिगरी करत आहेत, त्यांनाही पुढच्या वेळी संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आॅगस्ट महिन्यात हॉकी संघ युरोप दौºयावर जाणार असून बेल्जियम आणि नेदरलँडविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यामुळे आगामी काळातही भारतीय संघाचा प्रवास खडतर असाच असेल. (वृत्तसंस्था)