दिल्ली विजयी लय कायम राखणार?

By admin | Published: April 17, 2015 11:56 PM2015-04-17T23:56:04+5:302015-04-17T23:56:04+5:30

पराभवाची मालिका खंडित करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी आयपीएल-८ मध्ये सनराइजर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्यास इच्छुक आहे.

Will the Delhi maintain the winning goal? | दिल्ली विजयी लय कायम राखणार?

दिल्ली विजयी लय कायम राखणार?

Next

विशाखापट्टणम : बराच वेळ विजयापासून दूर राहिल्यानंतर पराभवाची मालिका खंडित करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी आयपीएल-८ मध्ये सनराइजर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर लोळविण्यास इच्छुक आहे.
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्सकडून पराभूत झाल्यानंतर दिल्लीने तिसऱ्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबला नमवून विजयाचा स्वाद चाखला. खरेतर तिन्ही सामने जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या या संघाचे नशीब खराब होते. पराभवातून विजयाकडे वाटचाल करण्यासाठी दिल्लीला लय कायम राखावी लागेल. युवराज फॉर्ममध्ये परतला, ही दिल्लीसाठी दिलासा देणारी बाब. पंजाबविरुद्ध युवी आणि मयंक अगरवाल यांनी आक्रमक अर्धशतके ठोकली. युवीने खास शैलीत फटकेबाजी करीत चाहत्यांना खूष केले.
दिल्ली आणि हैदराबादची ताकद त्यांचा आघाडीचा फलंदाजी क्रम आहे. जो संघ परिस्थितीचा लाभ घेईल त्यांचे पारडे जड ठरेल. हैदराबादला गुरुवारी येथे राजस्थान रॉयल्सने पराभूत केले होते.
हैदराबादचे डेव्हिड मिलर आणि शिखर धवन हे फॉर्ममध्ये असून युवा लोकेश राहुल याने बेंगळुरुसाठी चांगली कामगिरी बजावली. विकेट कठीण ठरणार असेल तर मात्र हैदराबादच्या फलंदाजांना संयम बाळगावा लागेल. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी गुरुवारी चिवटपणाचे दर्शन घडविले
आहेच. अजिंक्य रहाणे याने मोठी फटकेबाजी टाळून एक किंवा दोन धावा घेतल्या हे विशेष. दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त लेग स्पिनर इम्रान ताहिर याच्यावर असेल. त्याने आठ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)

सनराइजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विल्यमसन, डेल स्टेन, मोझेस हेन्रिक्स, ईयोन मोर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशिष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, लक्ष्मीरतन शुक्ला, प्रवीण कुमार, हनुमान विहारी, प्रशांत पद्मनाभन, सिद्धार्थ कौल.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : जेपी डुमिनी (कर्णधार), मयंक अगरवाल, मनोज तिवारी, नाथन कूल्टर नाइल, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, एल्बी मोर्कल, क्वींट डिकॉक, जहीर खान, सी. गौतम, ट्रॅव्हिस हेड, इम्रान ताहिर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, केके जियास, डोमनिक मुथुस्वामी, शाहबाज नदीम, गुरिंदर संधू, मार्कस स्टोइनिस, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत, जयंत यादव व श्रीकर भारत.

Web Title: Will the Delhi maintain the winning goal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.