Paris Olympic 2024 : भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 08:52 AM2024-08-05T08:52:10+5:302024-08-05T09:19:39+5:30

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. ही तिन्ही पदके नेमबाजीत जिंकली आहेत. आज बॅडमिंटनमध्ये भारताला पदक मिळण्याची अपेक्षा आहे.

Will India get a fourth medal? Paris Olympic 2024 Day 10 India Schedule | Paris Olympic 2024 : भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

Paris Olympic 2024 : भारताला चौथं पदक मिळणार? जाणून घ्या पॅरिस ऑलिम्पिकमधील आजचे वेळापत्रक

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काल भारतीय हॉकी संघाने चमकदार कामगिरी केली. आज भारताला बॅडमिंटनमधून चौथे पदक मिळू शकते. लक्ष्य सेन आज कांस्यपदकासाठी खेळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत ३ पदके जिंकली आहेत. हे तिनही पदके शूटिंगमधून मिळाली आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला मनू भाकरने दोन पदक मिळवून दिली आहेत.त्यानंतर मनू भाकरनेही मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्य मिळवले. तिच्यासोबत सरबज्योत सिंह संघात होता. स्वप्नील कुसाळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत तिसरे कांस्यपदक जिंकले. 

जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे आजचे वेळापत्रक

नेमबाजी

स्किट मिश्रित संघ (क्वालिफिकेशन): माहेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंह नारुका - दुपारी १२.३० वाजता

टेबल टेनिस

महिला संघ (प्री-क्वार्टर फायनल): भारत विरुद्ध रोमानिया - दुपारी १.३० वाजता

नौकायन

महिला डिंगी (ओपनिंग सीरिज): रेस नाइन - दुपारी ३.४५ वाजता 

महिला डिंगी (ओपनिंग सिरीज): रेस १० - दुपारी ४.५३ वाजता 

पुरुष डिंघी (ओपनिंग सीरीज) मालिका): शर्यत ९ - ६.१० वाजता 

पुरुष डिंगी (ओपनिंग सिरीज): शर्यत १० - संध्याकाळी ७.१५ वाजता.

एथलेटिक्स

महिला ४०० मी (फेरी १): किरण पहल (हीट फाइव्ह) - दुपारी ३.५७ वाजता. 

पुरुष ३,००० मीटर स्टीपलचेस (फेरी १): अविनाश साबळे (हीट टू) - रात्री १०.५० वाजता

बॅडमिंटन

पुरुष एकेरी (कांस्य पदक प्लेऑफ): लक्ष्य सेन विरुद्ध ली जी जिया (मलेशिया) - सायंकाळी ६.०० वाजता. 

हॉकी संघाची चमकदार कामगिरी

भारतीय हॉकी संघाने काल मोठी कामगिरी केली. हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने शानदार विजय नोंदवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हॉकी संघाने ब्रिटनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Web Title: Will India get a fourth medal? Paris Olympic 2024 Day 10 India Schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.