विराटच्या आक्रमकतेवर नियंत्रण आणणार नाही - अनिल कुंबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2016 04:56 PM2016-07-04T16:56:26+5:302016-07-04T16:56:26+5:30
भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची जी नैसर्गिक आक्रमक प्रवृत्ती आहे त्याला मी रोखणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. ४ - भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची जी नैसर्गिक आक्रमक प्रवृत्ती आहे त्याला मी रोखणार नाही. मला आक्रमकता आवडते. मी सुद्धा आक्रमक होतो. मी कोणाच्या नैसर्गिक प्रवृत्तीला नियंत्रित करणार नाही असे भारताचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सोमवारी सांगितले.
वेस्ट इंडिज दौ-यावर रवाना होण्यापूर्वी बंगळुरुमध्ये पत्रकारपरिषदेत कुंबळे बोलत होते. सहा जुलै पासून भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा सुरु होत आहे. भारत वेस्ट इंडिज दौ-यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिली कसोटी २१ जुलैपासू अँटीगा येथे सुरु होत आहे.
बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सहा दिवसांचे भारताचे सराव सत्र झाले. सराव सत्रात अनिल आमच्या बरोबर होते ही मोठी गोष्ट आहे. त्यांचा अनुभव आमच्यासाठी महत्वाचा आहे असे विराट कोहलीने सांगितले.