चांदीमलविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम राखणार : मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 10:50 PM2015-08-18T22:50:15+5:302015-08-18T22:50:15+5:30

कुमार संगकाराचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असला तरी भारतीय संघाची नजर गेल्या सामन्यातील शतकवीर फलंदाज दिनेश चांदीमलवर आहे.

Will retain aggressive posture against silvermill: Mishra | चांदीमलविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम राखणार : मिश्रा

चांदीमलविरुद्ध आक्रमक पवित्रा कायम राखणार : मिश्रा

Next

कोलंबो : कुमार संगकाराचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना असला तरी भारतीय संघाची नजर गेल्या सामन्यातील शतकवीर फलंदाज दिनेश चांदीमलवर आहे. या श्रीलंकन फलंदाजाला गुरुवारपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता येणार नाही, असे मत भारताचा लेगस्पिनर अमित मिश्राने व्यक्त केले.
येथील पी. सारा ओव्हल मैदानावर सराव सत्रानंतर पत्रकारांसोबत बोलताना मिश्रा म्हणाला, ‘आम्ही त्याच्या फलंदाजीच्या व्हिडिओ टेप्स बघितल्या असून, संघाच्या बैठकीमध्ये आम्ही त्याबाबत चर्चा करू. त्याच्यासाठी कशी गोलंदाजी करायची आणि क्षेत्ररक्षक कुठे तैनात करायचे, याबाबतची रणनीती संघाच्या बैठकीत ठरेल. त्याला नैसर्गिक फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’
मिश्रा म्हणाला, ‘भारतीय फलंदाजांना फिरकी मारा खेळताना अडचण भासत असेल, असे वाटत नाही. आमचे सर्व फलंदाज फिरकी मारा चांगला खेळतात. अनेकदा दडपणाखाली एक-दोन विकेट बहाल केल्याचे नाकारत नाही; पण दडपणाखाली चूक कुणाकडूनही होऊ शकते.

Web Title: Will retain aggressive posture against silvermill: Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.