दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन रद्द; आता २०२१ मध्ये होणार पुढील स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:21 AM2020-04-02T00:21:28+5:302020-04-02T00:21:45+5:30
कोरोना विषाणूच्या प्रार्दुुभावाने विम्बल्डन २०२० ही स्पर्धा होऊ शकत नाही. ’ स्पर्धेचे पुढचे सत्र २८ जून ते ११ जुलै २०२१ दरम्यान होणार आहे.
लंडन : कोरोना व्हायरसमुळे टेनिस विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची विम्बल्डन टेनिस स्पर्धा यंदा रद्द करण्यात आली आहे. दुसºया महायुद्धानंतर पहिल्यांदाच ही सर्वात जुनी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.आॅल इंग्लंड क्लबने तातडीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. या वर्षी ही स्पर्धा होणार नाही. विम्बल्डन ही स्पर्धा आॅल इंग्लंड क्लबच्या ग्रासकोर्टवर २९ जून ते १२ जुलैच्या दरम्यान खेळली जाणार होती.
आयोजकांनी सांगितले की, मोठ्या दु:खाने आम्ही आॅल इंग्लंड क्लब बोर्ड आणि चॅम्पियनशिपच्या आयोजन समितीने हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रार्दुुभावाने विम्बल्डन २०२० ही स्पर्धा होऊ शकत नाही. ’ स्पर्धेचे पुढचे सत्र २८ जून ते ११ जुलै २०२१ दरम्यान होणार आहे.या स्पर्धेचे पहिले सत्र १८७७ मध्ये खेळले गेले. आणि त्यानंतर प्रत्येकवर्षी ही स्पर्धा झाली. फक्त १९१५ आणि १९१८ च्या पहिल्या महायु्द्धाच्या दरम्यान आणि नंतर १९४० आणि १९४५ च्या दुसºया महायुद्धाच्या दरम्यान ही स्पर्धा होऊ शकली नव्हती.
यासोबतच एटीपी आणि डब्ल्यूटीएने विम्बल्डनच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या स्पर्धा देखील रद्द केल्या आहेत. आता नवे सत्र १३ जुलैच्या आधी सुरू होऊ शकणार नाही. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या आधीच टोकियो आॅलिम्पिक स्थगित करण्यात आले आहे. मे मध्ये होणारी फ्रेंच ओपन ही स्पर्धा आता सप्टेंबरच्या अखेरीस होणार आहे. अमेरिकन ओपन ३१ आॅगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. विम्बल्डन रद्द होणे याचा अर्थ अनेकदा चॅम्पियन राहिलेले रॉजर फेडरर, सेरेना विलियम्स आणि व्हीनस विलियम्स यांनी आॅल इंग्लंडवर स्वत:चा अखेरचा सामना आधीच खेळला असावा, असा होऊ शकतो. फेडरर आणि सेरेना हे २०२१ च्या स्पर्धेपर्यंत वयाची चाळीशी गाठतील तर व्हीनस ४१ वर्षांची होणार आहे. मागच्या वर्षी हालेपकडून अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या सेरेनाच्या नावे अद्याप २३ ग्रॅन्डस्लॅमचे जेतेपद आहे. मार्गारेट कोर्टच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी सेरेनाला एका जेतेपदाची गरज आहे. उन्हाळ्यानंतर किंवा हिवाळ्यापूर्वी स्पर्धेचे आयोजन झाल्यास येथे लवकर सूर्यास्त होतोे. त्यामुळे देखील इंग्लंडमधील ही स्पर्धा स्थगित करणे व्यवहारिक होणारे नव्हते. (वृत्तसंस्था)
युएस ओपन निर्धारीत वेळेतच होणार - आयोजक
४न्यूयॉर्क : युएस ओपनचे आयोजक अजूनही निर्धारीत वेळेतच आयोजित करण्यावर ठाम आहेत. विम्बल्डन रद्द झाल्यानंतर देखील युएस टेनिस असोसिएशनने ही स्पर्धा वेळेतच होईल, असे म्हटले आहे.
४ही स्पर्धा ३१ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात होणार आहे. तर फ्रेंच ओपन पुढे ढकलण्यात आली आहे.
४युएसटीएने एका वक्तव्यात म्हटले की, सध्या आम्ही युएसओपनला निर्धारीत वेळेतच पूर्ण करण्याचे लक्ष देत आहोत. आमची स्पर्धेची तयारी सुरू आहे. युएसटीए कोविड १९ महामारीमुळे बदलत असलेल्या परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष देत आहे. आणि कोणत्याही अडचणीच्या स्थितीचा सामना करण्यासाठी योजना बनवत आहे.
४नॅशनल टेनिस सेंटरच्या इनडोअर कोर्टमध्ये कोविड १९ च्या रुग्णांसाठी तात्पुरते हॉस्पिटल उभारले जाणार असले युएस टेनिस असोसिएशन म्हटले आहे की, आम्ही या महामारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.’ युएस ओपननंतर लगेचच फ्रेंच ओपन २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
४अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्कमध्ये आहेत. तेथेच युएस ओपनचे आयोजन केले जाते. युएसटीएने सांगितले की, आम्ही युएसटीएच्या तपासणी सल्लागारांच्या समूहासोबत सरकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवतो. आम्ही कोणत्याही स्थितीत युएस ओपनबाबत निर्णय घेताना खेलाडू, चाहते, आणि स्पर्धेच्या भागधारकांचे आरोग्य आणि कल्याण यांचा विचार करू.’