विम्बल्डन : मरे वि. बर्डीच कांँटे की टक्कर

By admin | Published: July 7, 2016 06:25 PM2016-07-07T18:25:38+5:302016-07-07T18:25:38+5:30

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि झेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डीच यांच्यामध्ये विम्बल्डन ओपन ग्रँडास्लॅमची रोमांचक उपांत्य लढत होईल

Wimbledon: Murray V. Birdish thorn kick | विम्बल्डन : मरे वि. बर्डीच कांँटे की टक्कर

विम्बल्डन : मरे वि. बर्डीच कांँटे की टक्कर

Next

विम्बल्डन : त्सोंगा व पोइली यांचे आव्हान संपुष्टात
लंडन : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे आणि झेक प्रजासत्ताकचा टॉमस बर्डीच यांच्यामध्ये विम्बल्डन ओपन ग्रँडास्लॅमची रोमांचक उपांत्य लढत होईल. तब्बल ५ सेटमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मरेने फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाचे तगडे आव्हान परतावून उपांत्य फेरी गाठली. तर दुसरीकडे बर्डीचने सहज कूच करताना फ्रान्सच्याच लुकास पोइलीचा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला.
तब्बल ३ सेट ५४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मरेला पहिले दोन सेट जिंकल्यानंतरही त्सोंगाविरुद्ध पुर्ण ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. त्सोंगाने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना ०-२ अशा पिछाडीवरुन सलग दोन सेट जिंकताना सामना २-२ असा बरोबरीत आणला. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये मात्र मरेने तुफानी खेळ करताना त्सोंगाला कोणतीही संधी न देता ७-६, ६-१, ३-६, ४-६, ६-१ असा विजय मिळवला.
दुसरीकडे एकतर्फी झालेल्या सामन्या बर्डीचने केवळ एक तास ५५ मिनिटांत बाजी मारताना लुकास पोइलीचे आव्हान संपुष्टात आणले. सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना बर्डीचने पोइलीला आपला खेळ करण्याची एकही संधी न देता ७-६, ६-३, ६-२ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत मरे विरुध्द बर्डीच अशी रोमांचक लढत होणार असून दोन्ही खेळाडू एकूण १५व्यांदा एकमेकांसमोर येतील. आतापर्यंतच्या १४ लढतीत मरेने ८ वेळा बाजी मारली असून ६ वेळा बर्डीचने विजय मिळवला आहे. (वृत्तसंस्था)
............................................
घरच्या प्रेक्षकांचा मिळत असलेल्या जबरदस्त पाठिंब्याच्या जोरावर मरेने १२व्या मानांकीत त्सोंगाविरुध्द वर्चस्व मिळवताना सातव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत बलाढ्य रॉजर फेडरर आणि मिलोस राओनिक यांच्यात लढत होईल.

Web Title: Wimbledon: Murray V. Birdish thorn kick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.