विम्बल्डन टेनिस : सानिया- हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत

By admin | Published: July 3, 2016 07:58 PM2016-07-03T19:58:21+5:302016-07-03T19:58:21+5:30

दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने आपल्या घरच्या समर्थकांसमोर आपल्या नावाला साजेसा खेळ करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलिमॅनचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश

Wimbledon Tennis: Sania-Hingis pair enters second round | विम्बल्डन टेनिस : सानिया- हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत

विम्बल्डन टेनिस : सानिया- हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ३ : दुसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅन्डी मरेने आपल्या घरच्या समर्थकांसमोर आपल्या नावाला साजेसा खेळ करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत आॅस्ट्रेलियाच्या जॉन मिलिमॅनचा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महिलांच्या गटात माजी विजेती अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने तिसऱ्या फेरीत जर्मनीच्या एनिका बेकचा पराभव करून आपल्या २२ व्या ग्रॅन्डस्लॅमकडे आगेकुच केली. तिसरे मानांकन असलेल्या पोलंडच्या अ‍ॅग्निज्स्का रंदावास्काने चेक गणराज्यची कॅटरिना सिनियाकोव्हाला पराभूत करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
विम्बल्डन स्पर्धेत २०१३ मध्ये विजेता असलेल्या मरेने आॅस्ट्रेलियाच्या जॉनला तीन सेटमध्ये ६-३, ७-५, ६-२ गुणांनी नमविले. जोकाविच पराभूत झाल्यानंतर आता या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या ड्रॉमध्ये मरेच अग्रमानांकन खेळाडू राहिला आहे. मरेला चौथ्या फेरीत २१ वर्षीय स्पेनच्या निक किर्गियोस किंवा फेलिसियानो लापेज यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढावे लागणार आहे.
महिलांच्या गटात सेरेनाने एनिकाला ५१ मिनिटात ६-३, ६-० असा पराभव करून आपला ३०० वा विजय नोंदविला. तिसरे मानांकित असलेली पोलंडच्या रंदावास्काने कॅटरिनाला सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-१ गुणांनी नमविले. नववे मानांकन असलेल्या मॅडिसन कीने फ्रान्सच्या अलाइज कोनेंटला ६-४, ५-७, ६-२ गुणांनी पराभूत केले.
सानिया-हिंगीस जोडी दुसऱ्या फेरीत
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्सर्लंडची मार्टिना हिंगीसने जर्मन जोडी अ‍ॅना लेना फ्रिडसॅम आणि एल. सेजमंड जोडीला ६-२, ७-५ असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सानिया-हिंगीसने हा लढत एक तास २१ मिनिटांत जिंकली.
दुसरीकडे पुरुष दुहेरीत भारताचा रोहण बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने सहावी मानांकित जोडी स्लोवाकियाचा आंद्रेज मार्टिन आणि चिलीचा हेंस केस्टिलो या जोडीला १ तास १८ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-५, ६-२ असे नमविले.

Web Title: Wimbledon Tennis: Sania-Hingis pair enters second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.