युकी आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉपासून एक विजय दूर
By Admin | Published: January 13, 2017 01:12 AM2017-01-13T01:12:20+5:302017-01-13T01:12:20+5:30
युकी भांबरीने गुरुवारी पात्रता फेरीच्या दुसऱ्या लढतीत सर्बियाच्या पेद्जा क्रस्टिनचा ६-३, ६-४ ने पराभव करीत
मेलबोर्न : युकी भांबरीने गुरुवारी पात्रता फेरीच्या दुसऱ्या लढतीत सर्बियाच्या पेद्जा क्रस्टिनचा ६-३, ६-४ ने पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली. २४ वर्षीय युकीने २००९ मध्ये ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते.
युकीने आज ६८ मिनिटे रंगलेल्या लढतीत तीन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला. युकीने प्रत्येक सेटममध्ये एकदा प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली व वर्चस्व गाजवले. युकीला यानंतरच्या फेरीत २१ व्या मानांकित अमेरिकेच्या अर्नेस्टो एस्कोबेडोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एस्कोबेडोने जपानच्या तातसुमा इटोचा ६-१, ६-३ ने पराभव केला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना युकी म्हणाला, ‘आज माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली. माझ्यासाठी हा आणखी एक चांगला विजय आहे. मी चांगली सर्व्हिस केली आणि मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली. अखेरच्या फेरीत खडतर लढत होणार असून यात काय घडते, याबाबत उत्सुकता आहे.’ (वृत्तसंस्था)