विजयी होणार, हा अंतर्मनाचा कौल होता - फ्रान्सिस टीएफो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:13 AM2021-06-30T08:13:51+5:302021-06-30T08:14:08+5:30

विजयानंतर टीएफो पुढे म्हणाला ‘ज्येष्ठ आणि महान खेळाडूंसमोर उभा ठाकलो की माझा खेळ नेहमीच बहरतो. लहानपणापासूनच मी ग्रास कोर्टवर खेळतो

To win, it was a matter of conscience - Francis Tifo | विजयी होणार, हा अंतर्मनाचा कौल होता - फ्रान्सिस टीएफो

विजयी होणार, हा अंतर्मनाचा कौल होता - फ्रान्सिस टीएफो

googlenewsNext

उदय बिनिवाले

लंडन : तिसरा मानांकित स्टिपानोस सिटसिपासचा ६-४ ६-४ ६-३ अशा सरळ सेट मध्ये फडशा पाडून जागतिक क्रमवारीत ५७ वा असलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सिस टीएफोने विम्बल्डन २०२१ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सनसनाटी निर्माण केली .

विजयानंतर टीएफो पुढे म्हणाला ‘ज्येष्ठ आणि महान खेळाडूंसमोर उभा ठाकलो की माझा खेळ नेहमीच बहरतो. लहानपणापासूनच मी ग्रास कोर्टवर खेळतो. घसरायचो, पडायचो पण मजा यायची, त्यामुळे माझा खेळ सुधारला आणि आक्रमक झाला. सेंटर कोर्ट नंबर एकवर खेळणे हा बहुमान समजतो.’ धक्कादायक पराभवानंतर ग्रीसच्या सिटसिपासने  ग्रास कोर्टवरील अनुभव कमी पडल्याची कबुली दिली. टीएफोचा खेळ निश्चितच सरस झाला आणि माझ्याकडे प्रत्त्युत्तर नव्हते, असे तो म्हणाला.
नंबर वन आणि अव्वल मानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सहज सामना जिंकून यशस्वी सुरुवात केली. तुफानी सर्व्हिस, २५ ‘एसेस’ अशा जोकोविचच्या झंझावाताला नवख्या, तरुण जेक ड्रॅपरकडे उत्तर नव्हते. विजयानंतर जोको म्हणाला की ‘मी आज अनेक सर्वोत्तम सर्व्हिस केल्या.’

Web Title: To win, it was a matter of conscience - Francis Tifo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस