विंडीजला दे धक्का
By admin | Published: July 31, 2016 05:52 AM2016-07-31T05:52:00+5:302016-07-31T05:52:00+5:30
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी दे धक्का दिला
किंग्स्टन : भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही वेस्ट इंडीजला पहिल्या दिवशी दे धक्का दिला. आर. आश्विनचे ३, तर ईशांत शर्माच्या दोन बळींमुळे विंडीजचा डाव ३५ षटकांत ६ बाद १२६ अशा संकटाला सापडला. विंडीजच्या ब्लॅकवूडने ६२ चेंडूंत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६२ धावा केल्या. त्याची खेळी सर्वाेत्तम ठरली. इतर फलंदाज अपयशी ठरले.
सबीना पार्कच्या हिरव्यागार पीचवर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डनचा नाणेफेकीचा निर्णय भारतासाठी फायदेशीर ठरला. ईशांत तिसऱ्या षटकांतच सलग दोन बळी घेतले. अवघ्या ६ षटकांत विंडीजने ३ फलंदाज गमावले. दोन धक्क्यांमुळे विंडीजची अवस्था ६ षटकांत ११ धावांत ३ बळी, अशी झाली होती. त्यांचे मार्लाेन सॅम्युअल्स शून्य तर ब्लॅकवूड ४ धावांवर खेळत होते. सलामीवर ब्रेथवेट १, तर ब्राव्होला एकही धाव काढता आली नाही. दोघेही ईशांतचे बळी ठरले. तिसरा धक्का मोहंमद शमीने दिला. त्याने चंद्रिकाला ५ धावांवर बाद केले. त्यानंतर मार्लाेन सॅम्युअल्स (१४) आणि जर्मेइन ब्लॅकवूड (६२) यांनी चौथ्या गड्यासाठी ८१ धावांची भागीदारी केली. यामध्ये ब्लॅकवूडने महत्त्वपूर्ण ६२ धावांचे योगदान दिले. उपाहारापूर्वी त्याला आश्विनने पायचीत केले.दरम्यान, भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ९२ धावांनी जिंकला होता. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दुखापतग्रस्त मुरली विजयच्या जागी लोकेश राहुल याला संधी दिली. तर, होल्डरने कार्लाेस ब्रेथवेटच्या जागी मिगेल कमन्सिला संधी दिली.
>शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्टइंडीजच्या ३७ षटकांत ७ बाद १३२ धावा झाला होत्या. कर्णधार होल्डर व बिशू प्रत्येकी १ धाव काढून
खेळत होते.
>धावफलक: वेस्ट इंडीज (पहिला डाव) ६ बाद १२७, ब्रेथवेट झे पुजारा गो. शर्मा १, चंद्रिका झे राहुल गो. शमी ५, ब्राव्हो झे कोहली गो. शर्मा ०, सॅम्युएल झे. राहुल गो. आश्विन ३७, ब्लॅकवूड पायचीत आश्विन ६२, चेस ७, डोवरिच यष्टीचीत साहा गो. आश्विन ५. गोलंदाजी : ईशांत शर्मा १०-१-५३-२, मोहंमद शमी ७-१-१३-१, आश्विन ८-१-२३-३, उमेश यादव ५-१-२०-०, अमित मिश्रा ५-२-१८-०.