पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका

By admin | Published: August 29, 2016 02:00 AM2016-08-29T02:00:11+5:302016-08-29T02:00:11+5:30

दोन सामन्यांची टी२० मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी रविवारचा सामना अनिवार्य असलेल्या भारताच्या पदरी अखेर निराशाच आली.

Windies won the series with the help of rain | पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका

पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका

Next

फ्लोरिडा : दोन सामन्यांची टी२० मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी रविवारचा सामना अनिवार्य असलेल्या भारताच्या पदरी अखेर निराशाच आली. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा सामना पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आल्याने टीम इंडियाला टी२० मालिकेत ०-१ असा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने पहिला सामना अवघ्या एका धावेने जिंकून मालिकेत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.
भारतीय संघाने रविवारी दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे तांत्रिक कारणामुळे आधीच या सामन्यास ४० मिनिटे उशीराने सुरुवात झाली होती. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २ षटकात नाबाद १५ धावा काढल्या होत्या. मात्र, नेमकी यावेळी पावसाने दमदार खेळी करुन सामना रद्द करण्यास भाग पाडले.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विं ब्न डीजतर्फे जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. लेंडल सिमन्स (१९), किरोन पोलार्ड व आंद्रे रसेल (प्रत्येकी १३ धावा) आणि कार्लोस ब्रेथवेट (१८) यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही.
धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजांनी शनिवारी केलेल्या चुकांपासून बोध घेत आज अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताने आज स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी फिरकीपटू अमित मिश्राला संधी दिली तर विंडीजने शनिवारी खेळलेला संघच कायम राखला. मिश्राचा खेळविण्याचा निर्णय यशस्वी ठरला. त्याने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. जसप्रित बुमराह (२-२६), रविचंद्रन अश्विन (२-११), शमी (२-३१) व भूवनेश्वर (१-३६) यांची त्याला योग्य साथ लाभली.

धावफलक
वेस्ट इंडिज : जॉन्सन चार्ल्स झे. रहाणे गो. मिश्रा ४३, लुइस झे. मिश्रा गो. शमी ०७, मार्लोन सॅम्युअल्स झे. धोनी गो. बुमराह ०५, लेंडल सिमन्स यष्टिचित धोनी गो. अश्विन १९, आंद्रे फ्लेचर त्रि. गो. बुमराह ०३, किरोन पोलार्ड पायचित गो. अश्विन १३, आंद्रे रसेल झे. कोहली गो. भूवनेश्वर १३, ड्वेन ब्राव्हो त्रि. गो. मिश्रा ०३, कार्लोस ब्रेथवेट त्रि. गो. मिश्रा १८, सुनील नरेन नाबाद ०९, सॅम्युअल बद्री त्रि. गो. शमी ०१. अवांतर (९). एकूण १९.४ षटकांत सर्वबाद १४३.
बाद क्रम : १-२४, २-५०, ३-७६, ४-७६, ५-९२, ६-९८, ७-१११,८-१२३, ९-१३३, १०-१४३.
गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३६-१, शमी २.४-०-३१-२, मिश्रा ४-०-२४-३, जडेजा २-०-११-०, अश्विन ३-०-११-२, बुमराह ४-०-२६-२.
भारत : रोहित शर्मा नाबाद १०,
अजिंक्य रहाणे नाबाद ४. अवांतर -१, एकूण : २ षटकात बिनबाद १५. गोलंदाजी : आंद्रे रसेल १-०-७-०; सॅम्युअल बद्री १-०-७-०.

Web Title: Windies won the series with the help of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.