मुंबईचा पारस कुमार नाशिक मॅरेथॉनचा विजेता
By Admin | Published: January 5, 2015 12:59 AM2015-01-05T00:59:15+5:302015-01-06T00:48:58+5:30
आरोग्यासाठी धावले साडेपाच हजार नागरिक
आरोग्यासाठी धावले साडेपाच हजार नागरिक
नाशिक : मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वतीने आयोजित दुसर्या राष्ट्रीय, सातव्या राज्यस्तरीय तसेच १६व्या नाशिक मविप्र मॅरथॉनचे विजेतेपद मुंबईच्या पारस कुमार याने पटकावले़ आरोग्यासाठी या मॅरेथॉनमध्ये ५ हजार ६५१ स्पर्धक तसेच नागरिक धावले़
गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून तसेच हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला़ प्रारंभी ४२़ १९५ राष्ट्रीय मॅरेथॉनच्या स्पर्धेस सुरुवात झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने विविध १४ गटांतील स्पर्धांना सुरुवात झाली़ गगन नारंग व मविप्रच्या पदाधिकार्यांनी मॅरेथॉन मार्गावर खुल्या गाडीतून रपेट मारत धावणार्यांचा उत्साह वाढविला़ या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ांसह उत्तर प्रदेश, बिहार, राज्यस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, दिल्ली आदि राज्यांतील ५ हजार ६५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला़ विजेत्यांना गगन नारंग व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले़
याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयातील उत्कृष्ट खेळाडंूचा सत्कार उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला़ यामध्ये स्वप्नील चिकणे, श्वेता जाधव, अमोल बोराडे, वैशाली तांबे, उत्तरा खानापुरे, हर्षवर्धन गावित, शरयू पाटील यांचा समावेश होता़
याप्रसंगी ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक विजय बेंगाळे, महाराष्ट्र हौशी ॲथलेटिक्सच्या निरीक्षक कल्पना तेंडुलकर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती ॲड़ नितीन ठाकरे, महापालिका आयुक्त डॉ़ प्रवीण गेडाम, क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, उपसभापती नाना दळवी, चिटणीस सुनील ढिकले, संचालक भाऊसाहेब खातळे, रवींद्र देवरे, श्रीराम शेटे, नाना महाले, दिलीप मोरे, दिलीप पाटील, भरत कापडणीस, डॉ़ तुषार शेवाळे, कृष्णाजी भगत, डॉ़ विश्राम निकम, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब पाटील, नंदू कोर, डॉ़ अशोक पिंगळे, प्राचार्य दिलीप धोंडगे आदि उपस्थित होते़
केटीएचएममध्ये नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा
नाशिक येथे नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्याची आपली खूप इच्छा आहे, असे याप्रसंगी आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला प्रतिसाद देत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात नेमबाजी प्रशिक्षण सुरू करण्यार असल्याची घोषणा चिटणीस नीलिमा पवार यांनी केली़ तसेच या अकॅडमीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मोफत प्रवेश तसेच राहण्याची व्यवस्था करून प्रशिक्षण देण्यात येईल,