विजय क्लबची दणदणीत बाजी

By admin | Published: April 21, 2016 04:09 AM2016-04-21T04:09:17+5:302016-04-21T04:09:17+5:30

विजय क्लब आणि अमर क्रीडा मंडळ या कसलेल्या संघांनी आपापल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना, आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी घोडदौड कायम राखली

Winning the championship club | विजय क्लबची दणदणीत बाजी

विजय क्लबची दणदणीत बाजी

Next

मुंबई : विजय क्लब आणि अमर क्रीडा मंडळ या कसलेल्या संघांनी आपापल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना, आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या ‘अ’ गटात विजयी घोडदौड कायम राखली. त्याच वेळी ‘ब’ गटातून सिद्धेश्वर व दुर्गामाता संघांनी कूच केली.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत विजय क्लबने अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात श्री साई क्रीडा मंडळाचा ४४-१२ असा धुव्वा उडवला. मध्यंतरालाच विजय संघाने १८-८ अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. अजिंक्य कापरे आणि अमित चव्हाण यांनी तुफानी चढाया करताना प्रतिस्पर्धी संघाचा बचाव भेदला, तर साई संघाच्या ज्ञानेश्वर चव्हाण आणि रवींद्र मांडवकर यांनी अनुक्रमे चढाया व पकडींच्या जोरावर अपयशी झुंज दिली.
याच गटातील अन्य सामन्यात अमर क्रीडा मंडळाने सहज बाजी मारताना, साऊन कॅनरा स्पोटर््स क्लबचे आव्हान ३९-१७ असे संपुष्टात आणले. नितीन विचारे, सच्चिदानंद गावकर आणि रोहित उधटराव यांनी दमदार चढाया व पकडी करताना संघाच्या विजयात निर्णायक खेळ केला. पराभूत संघाकडून गौरव शेट्टी व स्वप्निल दौड यांनी संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. यानंतर, झालेल्या लढतीत विजय नवनाथने शानदार बाजी मारताना, जयभारत क्रीडा मंडळाला २७-१३ असे लोळवले, तर यंग विजय क्रीडा मंडळ संघाला वीर संताजी मंडळाविरुद्ध २६-३३ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: Winning the championship club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.