भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

By admin | Published: February 27, 2016 04:01 AM2016-02-27T04:01:54+5:302016-02-27T04:01:54+5:30

भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ९ गडी राखून दणदणीत

The winning sound of the Indian women's team | भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय

Next

रांची : भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करताना शुक्रवारी येथे झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी २0 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ९ गडी राखून दणदणीत विजय केला. या विजयाबरोबरच भारताने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत श्रीलंकेचा ३-0 असा सफाया केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकन संघ ९ बाद ८९ धावाच उभारू शकला. भारताने हे आव्हान १३.५ षटकांत १९१ धावा करीत पूर्ण केले.
भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचे फक्त चार फलंदाज इशानी लोकुसुरियगे (नाबाद २५), चामरा अटापट्टू (२१), अमा कांचना (१७) आणि निपुन हंसिका (१३) हेच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले.
भारताकडून डावखुरी फिरकी गोलंदाज एकता बिष्टने १७ धावांत ३ गडी बाद केले. अनुजा पाटीलने १९ धावांत २ गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने ४३ चेंडूंत नाबाद ४३ आणि वेलास्वामी वनिता हिने २५ चेंडूंत ३४ धावांची खेळी केली व ५२ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी करत भारताला शानदार सुरुवात करून दिली. वनिता तंबूत परतल्यानंतर स्मृती मानधना हिने वेदा कृष्णमूर्तीच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: The winning sound of the Indian women's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.