चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी संघ आणि त्यांची कामगिरी
By Admin | Published: May 24, 2017 06:29 AM2017-05-24T06:29:26+5:302017-05-24T13:26:14+5:30
आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते.
नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. 1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. सुरुवतीला या ट्रॉफीचे नाव नॉक आउट टूर्नामेंट होते. मात्र त्यात बदल करून आयसीसी चॅमिप्यन्स ट्रॉंफी ठेवण्यात आले. नॉक आउट टूर्नामेंटमध्ये एकदा पराभूत झालेल्या संघाला चषकाबाहेर जावे लागत होते. मात्र त्यानंतर चषकाच्या स्वरूपात बदल करून चषकाची रचना गटनिहाय करण्यात आली. अर्थात प्रत्येक गटातील संघातील संघ कमीत कमी एकदा तरी लढत देऊ शकेल. तसेच गुणाच्या आधारावर संघाचे चषकातील भवितव्य अवलंबून असते.
यावर्षी आयसीच्या आठव्यांदा रंगणाऱ्या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. 1 जून पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेसाठी गतविजेता भारतीय संघ ब गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल. तर अ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. सात वेळा झालेल्या या स्पर्धेत द. आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येती एक वेळा ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. पावसामुळे भारत आणि श्रीलंकेला एकदा सामाईक विजेता घोषित केले होतं. तर ऑस्ट्रेलियाने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आजपर्यंत कशी झाली ही स्पर्धा. कोण आहेत विजेते आणि उपविजेते जाणून घेऊयात.
2013 (विजेता संघ - भारत, कर्णधार - एम.एस. धोनी) -
बांगलादेशात 1998 मध्ये पहिली "नॉक आउट टूर्नामेंट" आयोजित करण्यात आली होती. सुरुवतीला या ट्रॉफीचे नाव नॉक आउट टूर्नामेंट होते. मात्र त्यात बदल करून आयसीसी चॅमिप्यन्स ट्रॉंफी ठेवण्यात आले. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा चार विकेटने पराभव केला होता.