झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव, भारताने मालिकाही जिंकली

By Admin | Published: June 13, 2016 05:44 PM2016-06-13T17:44:36+5:302016-06-13T17:44:36+5:30

भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवल्यानंतर १२७ धावांचे आव्हान २६.५ षटकात आणि २ गड्यांच्या मोबदल्यात पार करत ३ सामन्याची मालिका २-० ने जिंकली.

Winning Zimbabwe by 8 wickets, India won the series | झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव, भारताने मालिकाही जिंकली

झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव, भारताने मालिकाही जिंकली

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
हरारे, दि. १३ : धोनीच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात यजमान झिम्बाब्वेचा १२६ धावांत खुर्दा उडवल्यानंतर १२७ धावांचे आव्हान २६.५ षटकात आणि २ गड्यांच्या मोबदल्यात पार करत ३ सामन्याची मालिका २-० ने जिंकली. कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून झिम्बाम्वेला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना ३४.३ षटकात सर्वबाद १२६ धावा केल्या. के राहूल आणि करुन नायर यांनी १४.४ षटकात ५८ धावांची सलामी दिली. पहिल्या सामन्यातील शतकवीर राहूल ३३ धावांवर बाद झाला. त्यानंतर नायर आणि रायडूने संयमी खेळी करत दुसऱ्या विकेटसाठी १२ षटकात ६७ धावांची भागीदरी केली. नायरने ३९ धावांची खेळी केली. रायडूने नाबाद ४१ धावांची खेळी केली.
 
झिम्बाब्वेकडून व्ही शिंबदा सोडता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. व्ही शिंबदा ने ५३ धावांची खेळी केली. चिगंबा आणि शिखदंर राजा यांना थोडाफार संघर्ष केला पण त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चिगंबा २१ शिखदंर राजाने १० धावाची खेळी केली. भारतीय गेलंदाजीपुढे इतर फलंदाज अपयशी ठरले. युवा यजुवेंद्र चहलने आपल्या फिरकीच्या जोरावर ३ फलंदाज बाद केले तर सरण आणि कुलकर्णींने प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. अक्षर पटेल आणि बुमरहाला ही प्रत्येकी एक विकेट मिळवण्यात यश आले.
 

Web Title: Winning Zimbabwe by 8 wickets, India won the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.