चेस ऑलिंपियाड जिंकले: इंटरनेट कनेक्शन तुटले, तरीही भारताने रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 20:42 IST2020-08-30T20:41:49+5:302020-08-30T20:42:35+5:30
पहिल्यांदाच चेस ऑलिंपियाडमध्ये भारत चॅम्पिअन बनला आहे. रशियावे ही स्पर्धा 24 वेळा जिंकली आहे.

चेस ऑलिंपियाड जिंकले: इंटरनेट कनेक्शन तुटले, तरीही भारताने रचला इतिहास
नवी दिल्ली: भारतीय टीमने रविलारी पहिल्यांदाच फिडे ऑनलाईन चेस ऑलिंपियाड जिंकत इतिहास रचला आहे. रशिया आणि भारतला विभागून चॅम्पिअनचा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारताकडून निहाल सरीन आणि दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, फायनल वेळी त्यांचे मध्येच इंटरनेट कनेक्शन गेले आणि गोंधळ उडाला होता. फायनलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये ही परिस्थिती ओढवली होती. यानंतर भारताने अधिकृत अपिल करत पुन्हा खेळ सुरु ठेवला होता.
🇷🇺 Russia and India 🇮🇳 are co-champions of the first-ever FIDE Online #ChessOlympiad.
— International Chess Federation (@FIDE_chess) August 30, 2020
Tournament's website: https://t.co/bIcj0hRMek#chess#IndianChess#шахматыpic.twitter.com/gP4sULP2kr
फिडेचे अध्यक्ष आर्केडी ड्वोरकोविच यांनी नंतर दोन्ही संघांना विभागून गोल्ड मेडल देण्याचा निर्णय घेतला. यामुळे पहिल्यांदाच चेस ऑलिंपियाडमध्ये भारत चॅम्पिअन बनला आहे. रशियावे ही स्पर्धा 24 वेळा जिंकली आहे. भारतीय संघाचे विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने अभिनंदन केले आहे.
We are the champions !! Congrats Russia!
— Viswanathan Anand (@vishy64theking) August 30, 2020