महिला तिरंदाजी संघ अव्वल; विश्वक्रमवारीत बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:52 AM2018-07-28T01:52:15+5:302018-07-28T01:52:37+5:30
भारताची ऐतिहासिक कामगिरी
कोलकाता : भारताच्या महिला तिरंदाजी कम्पाऊंड संघाने ताज्या विश्वक्रमवारीत ऐतिहासिक कामगिरीसह अव्वल स्थान पटकविले आहे. या कामगिरीचा लाभ पुढील महिन्यात इंडोनेशियात होणाऱ्या आशियाडदरम्यान निश्चित होईल.
कम्पाऊंड प्रकाराच अव्वल स्थान मिळविण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. रिकर्व्ह प्रकारात दीपिका कुमारी यापूर्वी विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली होती.
अंताल्या आणि बर्लिन विश्वचषकात रौप्य पदकाची कमाई करणाºया भारताच्या महिला संघाचे एकूण ३३४२.६ गुण झाले आहेत. दुसºया स्थानावर चायनीज तायपेई संघाचे सहा गुण कमी आहेत. विश्वचषकात रौप्य संपादन करणाºया दोन्ही संघात ज्योती सुरेखा वेन्नाम आणि मुस्कार किरार यांचा समावेश होता. अंताल्या स्पर्धेत दिव्या घयाल हिचा तिसरी खेळाडू म्हणून तर बर्लिन स्पर्धेच्यावेळी तृषा देव हिचा संघात समावेश होता.
वैयक्तिक गटात अव्वल दहा खेळाडूंमध्ये भारताचे दीपिका कुमारी आणि अभिषेक वर्मा या दोन खेळाडूंचा समावेश आहे. दोन्ही खेळाडू क्रमश: रिकर्व्ह आणि कम्पाऊंड प्रकारात सातव्या स्थानावर आहेत. (वृत्तसंस्था)