Women"s In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:42 AM2017-07-24T07:42:52+5:302017-07-24T07:42:52+5:30

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्याने सर्वांनाच चटका लागला आहेत.

Women "s In Blue: Appeal and Appreciation from the Digest! | Women"s In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!

Women"s In Blue : दिगज्जांकडून हळहळ आणि कौतुक!

Next
ऑनलाइन लोकमत 
मुंबई,दि. 23 - आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्याने सर्वांनाच चटका लागला आहेत. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला निर्णायक लढतीत पराभव पत्करावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याचबरोबर भारतीय महिला संघातील मर्दानींचे कौतुक करण्यात येत आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू तसेच सर्वसामान्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. भारतीय महिला संघाला अंतिम लढतीत पराभव पत्करावा लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून संघाला सहानुभूती व्यक्त करताना स्पर्धेतील संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. भारतीय संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 
 
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीही संघाचे कौतुक केले. भारतीय महिला संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. मायदेशात परतल्यावर त्यांच्ये जोरदार स्वागत केले जाईल, असे विजय गोयल यांनी सांगितले.  
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनीही भारतीय महिला संघाचे कौतुक केले आहे. भारतीय संघाने मिळवलेले यश हा एक मैलाचा दगड आहे. आता प्रत्येकजण त्यांच्याकडे सन्मानाने पाहील, अरे ट्विट खन्ना यांनी केले. 
 
विश्वचषकात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करणारी पंजाबची क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर हिचे अभिनंदन करताना तिला पंजाब पोलीस दलात नोकरी देण्याची घोषणा केली. 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अंतिम सामना सुरू झाल्यापासून ट्विट करत  भारतीय संघाला प्रोत्साहित करत होता. भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने हळहळ व्यक्त केली.  
वीरेंद्र सेहवागनेही महिला संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना यंदाच्या विश्वचषकात त्यांनी मिळवलेल्या यशाचा त्याला आणि देशाला अभिमान असल्याचे ट्विट केले. 

माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांनीही हातातोंडाशी आलेल्या विजयाने हुलकावणी दिल्याने हळहळ व्यक्त केली. पण भारतात आज महिला क्रिकेटचा विजय झाला आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Women "s In Blue: Appeal and Appreciation from the Digest!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.