महिला गटात मुंबई अजिंक्य

By Admin | Published: August 16, 2016 12:33 AM2016-08-16T00:33:07+5:302016-08-16T00:33:07+5:30

अंतिम सामन्यात पिछाडीवर असणाऱ्या मुंबई संघाने जबरदस्त खेळ करत ठाणे संघाला २-१ असे नमवले. या विजयाच्या जोरावर मुंबई संघाने ५२ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम

In the women's category, Mumbai Ajinkya | महिला गटात मुंबई अजिंक्य

महिला गटात मुंबई अजिंक्य

googlenewsNext

मुंबई : अंतिम सामन्यात पिछाडीवर असणाऱ्या मुंबई संघाने जबरदस्त खेळ करत ठाणे संघाला २-१ असे नमवले. या विजयाच्या जोरावर मुंबई संघाने ५२ व्या वरिष्ठ महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम स्पर्धेत महिला गटाचे अजिंक्यपद पटकावले. तर पुरुष गटात झालेल्या स्पर्धेत पुणे संघाने मुंबईविरुद्ध बाजी मारत विजेतेपदाला गवसणी घातली.
ठाणे येथील खारकर आळी येथे रंगलेल्या स्पर्धेत निर्णायक सामन्यात राधिका जोशीने संगीता चांदोरकरचा २५-१६, २५-१२ असा पराभव करत यजमान ठाणे संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र दुसऱ्याच एकेरीत मुंबईच्या प्रीती खेडेकरने प्रगती बिर्जेवर २५-१२, २५-० असा विजय मिळवत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक दुहेरी सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी बोर्डावर दमदार सुरुवात केली. मात्र मुंबईच्या अनुपमा केदार-नीलम घोडके यांनी अनुभवाच्या जोरावर विणा चव्हाण-मिताली पिंपळे जोडीवर २५-०, २०-२५, २५-२ अशी मात करत मुंबईला अजिंक्य बनवले.
पुरुष गटात मुंबईला पुणेकडून पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या एकेरीत अनिल मुंढेने योगेश धोंगडेचा २-० असा पराभव करत सामन्याला विजयी सुरुवात केली. तर मुंबईच्या संदीप देवरूखकरने बोर्डावर दमदार कामगिरी करत २-१ अशा फरकाने योगेश परदेशीला नमवले. मात्र दुहेरीत पुणेकर वसंत वैराळ-गणेश तावरे जोडीने रियाज अकबर अली-विकास धारियालाा २-१ असे नमवले. पुरुष एकेरीत सत्यनारायण दोंतूलने अग्रमानांकित पंकज पवारला २५-११, २५-० असे नमवत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. तर जितेंद्र काळे आणि प्रमोद शेवाळे यांनी अनुक्रमे ठाण्याच्या भरत मते (२-०) व जळगावच्या झुबैर सय्यद (२-१)वर विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: In the women's category, Mumbai Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.