महिला हॉकी : भारताने यजमान अमेरिकेला नमवले

By admin | Published: July 21, 2016 09:11 PM2016-07-21T21:11:01+5:302016-07-21T21:11:01+5:30

पहिल्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अमेरिका महिला हॉकी संघाला २-१ असे नमवले.

Women's hockey: India defeats hosts USA | महिला हॉकी : भारताने यजमान अमेरिकेला नमवले

महिला हॉकी : भारताने यजमान अमेरिकेला नमवले

Next

पराभवाचा वचपा काढला

मॅनहीम (अमेरिका) : पहिल्या सामन्यात झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढताना भारतीय महिला हॉकी संघाने यजमान अमेरिका महिला हॉकी संघाला २-१ असे नमवले. रिओ आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या भारताच्या महिलांनी यासह मालिकेत बरोबरी साधली आहे.
याआधी झालेल्या सामन्यात झुंजार खेळाचे प्रदर्शन करुनही अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे भारताला पराभवास सामोरे जावे लागले. यावेळी मात्र भारतीयांनी चुका सुधारताना यजमानांवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. सामन्यातील पहिला क्वार्टर गोलशुन्य बरोबरीत राहिल्यानंतर आक्रमक खेळ झाला.
यावेळी दुसऱ्या क्वार्टरच्या १९व्या मिनिटालाच जिल विटमरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना अमेरिकेला १-० असे आघाडीवर नेले. मात्र हा गोल अमेरिकेचा सामन्यातील अखेरचा गोल ठरला. यानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना यजमानांना पुनरागमनाची संधी दिली नाही. मध्यंतराला अमेरिकेने आघाडी कायम राखल्यानंतर भारतीयांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये प्रितीने ४५व्या मिनीटाला महत्त्वपुर्ण गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली. या गोलमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघाने एकामागोमाग एक हल्ले करताना यजमानांवर दबाव टाकला. अंतिम क्वार्टरमध्ये ५५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर लिलिमाने निर्णायक गोल करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दौऱ्यातील भारताचा पुढील सामना २२ जुलैला कॅनडाविरुध्द होईल.

Web Title: Women's hockey: India defeats hosts USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.