आॅसी दौऱ्यासाठी वंदनाकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व
By admin | Published: November 13, 2016 02:30 AM2016-11-13T02:30:14+5:302016-11-13T02:30:14+5:30
आक्रमक खेळाडू वंदना कटारिया ही २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आॅस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्नमध्ये होणाऱ्या हॉकी कसोटी मालिकेत भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे.
नवी दिल्ली : आक्रमक खेळाडू वंदना कटारिया ही २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान आॅस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्नमध्ये होणाऱ्या हॉकी कसोटी मालिकेत भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. बचावफळीतील खेळाडू सुनीता लाक्रा ही उपकर्णधार असेल. चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत चीनला नमवित जेतेपद पटकविणारा भारतीय
संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशादायी कामगिरीच्या भरपाईची भारतीय संघाला या दौऱ्यात संधी असेल.
महिला हॉकी संघ
गोलकिपर सविता, रजनी एटिमार्पू, बचावफळी दीप ग्रेस एक्का, सलिमा टेटे, सुनीता लाक्रा, रश्मिता मिंज, नवदीप कौर, मधली फळी: निक्की प्रधान, नवज्योत कौर, करिश्मा यादव, राणी, दीपिका, मोनिका. आक्रमक फळी: पूनम राणी, अनुराधा देवी थाकचोम, वंदना कटारिया (कर्णधार), प्रीती
दुबे, सोनिका.