महिला टी-२० वर्ल्डकप : इंग्लंडकडून भारताचा पराभव
By admin | Published: March 22, 2016 06:45 PM2016-03-22T18:45:12+5:302016-03-22T18:53:59+5:30
पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ लुईस नियमामुळे निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाला पुन्हा इंग्लंड महिला संघाकडून पराभव पत्करावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. २२ - पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ लुईस नियमामुळे निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाला पुन्हा इंग्लंड महिला संघाकडून पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात भारतीय महिला संघाने दिलेल्या २० षटकात आठ बाद ९० धावांचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाने १९ षटकात आठ बाद ९२ धावा केल्या. इंग्लंडच्या शेवटच्या फळीत पाठोपाठ विकेट्स गेल्यानंतर सामना फिरण्याची शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. इंग्लडची फलंदाज टैमी बीमोंट हिने या सामन्यात जास्त धावा केल्या. तिने १८ चेंडूत एक चौकार लगावत २० धावा केल्या. तर चार्लोट एडवडर्स (४), सराह टेलर (१६), नटाली स्किवर हिने१९ धावा केल्या.
भारताकडून हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक जास्त धावा केल्या. तिने या सामन्यात २६ धावा केल्या. तर स्मृती मानधना हिने १२ आणि मिताली राजने २० धावा केल्या.