महिला संघांतही होणार ‘काँटे की टक्कर’

By admin | Published: March 30, 2016 02:51 AM2016-03-30T02:51:01+5:302016-03-30T02:51:01+5:30

आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हे क्रिकेटमध्ये एकमेकांचे हाडवैरीच! आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धेत हेच दोन संघ अंतिम सामना खेळतात; पण २००९ नंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत उभय संघ

Women's team will also have a 'thorn in the thorn' | महिला संघांतही होणार ‘काँटे की टक्कर’

महिला संघांतही होणार ‘काँटे की टक्कर’

Next

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हे क्रिकेटमध्ये एकमेकांचे हाडवैरीच! आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धेत हेच दोन संघ अंतिम सामना खेळतात; पण २००९ नंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत उभय संघ परस्परांविरुद्ध आज बुधवारी खेळणार आहेत.
आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंड पाठोपाठ गटात दुसरे स्थान घेतले. इंग्लंड मागच्या पराभवाचा वचपा काढण्यास इच्छुक आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती असून इंग्लिश महिला खेळाडू ‘बिग बॅश’मध्येही खेळतात. आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूही इंग्लंडमधील महिलांच्या सुपर लीगमध्ये सहभागी होणार आहेत. इंग्लंडची कर्णधार चार्लोट एडवर्डस् आणि आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग स्वत:ला विजयाच्या दावेदार मानायला तयार नाहीत. आॅस्ट्रेलियाची जमेची बाब ही की त्यांनी कोटलावर दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. हा संघ येथील परिस्थितीशी एकरूप झाला. इंग्लंड मात्र बदला चुकविण्याच्या इराद्याने खेळणार आहे. इंग्लंडने २००९ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने २०१० ते २०१४ या काळात जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. यंदाच्या विश्वचषकात खेळलेल्या सर्वच सामन्यात दोन्ही कर्णधार येथील विकेटस्वर समाधानी नाहीत.

फिरोजशहा कोटला, नवी दिल्ली
दुपारी ३.०० पासून

‘‘याआधी दोनदा फायनलमध्ये हरलो. यंदा भाग्याची साथ लाभेल व आॅस्ट्रेलियाला नमवू अशी आशा आहे. आमच्यातील स्पर्धा जगजाहीर असल्याने कुठलेही दडपण नाही. आॅस्ट्रेलियाचा रथ उपांत्य फेरीतच रोखू.’ - चार्लोट एडवडर््स
कर्णधार, इंग्लंड

‘‘आम्ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत, असे म्हणणार नाही; पण आक्रमक खेळून विजय मिळवू. स्पर्धा दीर्घकाळापासून सुरू आहे. यंदा काट्याची टक्कर होईल, अशी आशा आहे.’’
- मेग लेनिंग, कर्णधार आॅस्ट्रेलिया.

Web Title: Women's team will also have a 'thorn in the thorn'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.