महिला वर्ल्डकप: दक्षिण आफ्रिकेचा पाकवर विजय

By admin | Published: June 26, 2017 01:23 AM2017-06-26T01:23:55+5:302017-06-26T01:23:55+5:30

शबनम इस्माईलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोमांचक सामन्यात

Women's World Cup: South Africa's Pakistan victory | महिला वर्ल्डकप: दक्षिण आफ्रिकेचा पाकवर विजय

महिला वर्ल्डकप: दक्षिण आफ्रिकेचा पाकवर विजय

Next

लिसेस्टर : शबनम इस्माईलच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोमांचक सामन्यात पाकिस्तानवर तीन विकेटसनी मात केली. पाकिस्तानच्या २0७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाने सहा चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला.
दक्षिण आफ्रिकेला लिजेल (६0) आणि लारा वोलवॉडर्ट (५२) यांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करुन चांगली सुरवात करुन दिली. परंतु पाकिस्तानी महिला खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करुन त्यांची धावसंख्या ७ बाद १७७ अशी केली. परंतु इस्माईल शबनम आणि सुने लूस यांनी ३0 धावांची भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

Web Title: Women's World Cup: South Africa's Pakistan victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.