Tokyo Olympic: ऑलिम्पिक पदक जिंकले, आता करा ५ वर्षे मोफत विमान प्रवास; दोन कंपन्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 04:41 PM2021-08-08T16:41:08+5:302021-08-08T16:48:46+5:30
Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे.
नवी दिल्ली: यंदाच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविणाऱ्या खेळाडूंवर बक्षीसांची लयलूट करण्यात आली आहे. सर्वाधिक बक्षीसे ही नीरज चोप्राला मिळाली आहेत. असे असले तरीदेखील गो एअरने या पदकविजेत्यांसाठी (Olympics medal winners) अफलातून ऑफर दिली आहे. गो फर्स्ट (Go First) ने या खेळाडूंना पुढील पाच वर्षे देशात, परदेशात त्यांच्या विमानाने मोफत प्रवास करण्याची संधी दिली आहे. (A number of Indian airlines, including Go First to Star Air, have now offered free air travel to all sportspersons from the country who won a medal at the 2020 Tokyo Olympics.)
Neeraj Chopra : गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा झाला करोडपती; ३ तासांत १६.७५ कोटींचे रोख बक्षीस जाहीर, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट
भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले आहे. यामुळे त्याच्या राज्याने सहा कोटी रुपये आणि फर्स्ट क्लास नोकरी देऊ केली आहे. तर बीसीसीआयने एक कोटी, पंजाब सरकारने दोन कोटी अशी बक्षीसे दिली आहेत. या आधी अभिनव बिंद्राने बिजिंग ऑलिम्पिकमध्ये शुटिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
गो एअरने दिलेल्या ऑफरमध्ये हे सहा खेळाडू आहेत. यामध्ये मीराबाई चानू , पी व्ही सिंधू, लवलीना बोरगोहेन, रवि कुमार दहिया, बजरंग पुनिया, नीरज चोपड़ा यांची नावे आहेत. महत्वाचे म्हणजे हॉकी पुरुषांच्या अख्ख्या संघाला देखील मोफत विमान प्रवास दिला जाणार आहे.
स्टार एअरने देखील अशीच घोषणा केली आहे. या सहा जणांसह हॉकी संघाला त्यांच्या विमानांच्या रुटवर मोफत विमान प्रवास जाहीर केला आहे.